शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

ठाणे जिल्ह्यात दंगामस्तीमुळे होतात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 1:08 AM

मुंबईच्या शेजारीच असणाºया ठाणे जिल्हा हा जरी शहरी असला तरी मोठ्या प्रमाणात निसर्ग सौंदर्य लाभले आहे. मुंबईपासून सहज एका दिवसात करता येण्याजोगे अनेक पर्यटनस्थळे

- पंकज पाटीलबदलापूर : मुंबईच्या शेजारीच असणाºया ठाणे जिल्हा हा जरी शहरी असला तरी मोठ्या प्रमाणात निसर्ग सौंदर्य लाभले आहे. मुंबईपासून सहज एका दिवसात करता येण्याजोगे अनेक पर्यटनस्थळे असल्याने येथे मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. पण अतिउत्साही पर्यटकांच्या दंगा मस्तीमुळे अनेक दुर्घटना घडतात. यंदाच्या मोसमात जिल्ह्यात विविध ठिकाणी पर्यटकांचा बळी गेला आहे.ठाणे जिल्ह्यातील बदलापूर आणि शहापूर ही दोन ठिकाणे पर्यटकांयाठी हॉट डेस्टीनेश आहे. यातबदलापूर ग्रामीण भागातील पर्यटनस्थळांपैकी एक म्हणजे कोंडेश्वर. अवघ्या १५ फुटांवरून वाहणाºया या धबधब्यात आतापर्यंत असंख्य जीव गेले आहेत. गेल्या वर्षी याच धबधब्यात ८ जणांनी जीव गमावले होते. मात्र, यंदा मोठ्या प्रमाणात निर्बंध घातले गेले. सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी सर्वत्र तारेचे कुंपण घातले. त्यामुळे यंदा येथील भोज धरणाला पंसती मिळाली. बदलापूरचा चंदनसिंग रावत (२३) हा मित्रांसह भोज धरणाच्या बंधाºयावर उभे राहून सेल्फी काढत असताना त्याचा तोल गेल्याने तो पाण्यात पडला. पोहता येत नसल्याने त्याचा मृत्यू झाला.पाण्याचा वेग ठरतो जीवघेणाटिटवाळा : मानिवली गावालगत वाहणाºया उल्हास नदीत पोहण्यासाठी गेलेल्या पाच मित्रांपैकी सादाब मुताईत शेख (१२) याचा ३० जुलै रोजी बुडून मृत्यू झाला. उल्हास नदीचे पात्र हे पर्यटकांचे आवडते स्थळ आहे. पावसाळ्यात नदीच्या पाण्याचा वेग प्रचंड असतो. तरीही, लोक पात्रात उतरून मृत्यूला कवटाळतात.उपचाराची संधी आणि सोय नाहीशहापूर : शहापूर तालुक्यात अनेक लहानमोठी पर्यटनस्थळे आहेत. तानसा, वैतरणा, भातसा हे तीन जलाशय आहेत. निसर्गरम्य माहुली गड आणि आजोबा पर्वत हे प्रमुख आकर्षण आहे. विद्युतनिर्मितीचा घाटघर जलविद्युत प्रकल्प आणि तानसा अभयारण्य आहे. याखेरीज माहुलीजवळ कसारा, डोळखांब परिसरात अनेक लहानमोठे धबधबे आहेत. मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे येथून पर्यटक आणि हौशी गिर्यारोहक येतात. अतिउत्साह, मद्यप्राशन करून धाडस दाखवण्याच्या नादात पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पर्यटनस्थळी दुर्घटना घडतात.शहापूर तालुक्यातील या पर्यटनस्थळांपाशी अपघात घडला किंवा एखाद्याला हृदयविकाराचा झटका आला, तर तातडीने चांगल्या इस्पितळात दाखल करण्याकरिता कुठलीही व्यवस्था नाही. परिणामी, एकट्या जुलै महिन्यात तीन जणांचा मृत्यू झाला.