ठाणे : मुंबई ते ठाणेदरम्यान चारही मार्गांवरील वाहतूक बंद असल्याची घोषणा केंद्रीय सूचना प्रसारण केंद्राकडून सुरू असतानाच ठाण्यापुढील स्थानकांवर मात्र मुंबईला जाणाºया गाड्यांची घोषणा सुरू असल्याने मंगळवारी अनेक प्रवासी गाड्यांत चढले आणि ठिकठिकाणी तासन्तास अडकून पडले. हा प्रकार रात्रीपर्यंत सुरू होता. इंडिकेटरवरही ठाण्याऐवजी ‘एसटी’ झळकत असल्याने गाड्या उशिरा का होईना; मुंबईला पोचतील या अपेक्षेने प्रवासी निघाले आणि सोळा-सोळा तास अन्नपाण्याविना अडकून पडले.मुंबई-ठाण्यातील मुसळधार पावसामुळे जेव्हा कुर्ला-सायन पट्ट्यात पाणी भरले तेव्हा टीव्हीपासून रेल्वेच्या केंद्रीय घोषणांपर्यंत ठिकठिकाणी चारही मार्गांवरील वाहतूक बंद असल्याचे सांगितले जात होते. ठाण्याच्या पुढे गाड्या जाणार नाहीत, अशा सूचना दिल्या जात होत्या. पण ठाणे, डोंबिवली, कल्याण असा प्रमुख स्थानकांतील इंडिकेटर मात्र ‘एसटी’ झळकवत होती आणि ‘गाड्या गंतव्यस्थानी नियोजित वेळेपेक्षा उशिरा पोचतील,’ अशा उद््घोषणा सुरू होत्या. त्यामुळे उशीर झाला तरी पोचू, या अपेक्षेने प्रवासी ठिकठिकाणी गाड्यांत चढत गेले आणि ठाण्यापुढे जाऊन घाटकोपरपासून अडकून पडले.त्याचवेळी जर नेमकेपणाने घोषणा झाल्या असल्या, तरी अनेकांनी प्रवास रद्द केला असता. पण अन्य प्रवासी जर पोचत असतील; तर आपण अकारण दांडी मारली असे होऊ नये, म्हणूनही बहुतांश प्रवाशांनी त्याही स्थितीत प्रवास सुरू ठेवला. तिच अवस्था लांब पल्ल्याच्या गाड्यांची झाली. त्यातील नेमक्या किती गाड्या रद्द झाल्या आहेत, त्याचाच थांग लागत नव्हता. दुरांतो एक्स्प्रेसच्या अपघातामुळे टिटवाळा ते कसारा वाहतूक बंद होती, याची माहिती सकाळीच मिळाली. पण अन्य मार्गांवरील लांब पल्ल्याच्या गाड्यांबाबत माहिती नेमकेपणाने मिळत नव्हती. त्यामुळे सामानसुमानासह, कुटुंबासह बाहेरगावी जाणारे प्रवासीही अडकून पडले.जादा गाड्या सोडण्यातही दिरंगाईजेव्हा ठाणे ते मुंबई वाहतूक ठप्प असल्याचे स्पष्ट झाले तेव्हा ठाण्याहून कल्याण, टिटवाळा, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत येथे जेवढ्या प्रमाणात गाड्या सोडणे अपेक्षित होते त्याचा निर्णय घेण्यातही रेल्वेने दिरंगाई केली.कळव्यात पाणी साठल्याने धीम्या मार्गाऐवजी जलद मार्गावरून काही गाड्या सोडून त्या दिव्यावरून धीम्या मार्गावर नेणे अपेक्षित होते, पण तोही निर्णय घेतला गेला नाही. परिणामी रात्रीपर्यंत प्रवासी अडकून पडले.कळव्यात पाणी तुंबल्याने लोकलच्या रांगा असूनही कल्याणच्या दिशेने त्याच मार्गावर गाड्या सोडण्यात आल्याने कळवा- मुंब्रा दरम्यान गाड्यांच्या रांगा लागल्या. त्याच गाड्या वेळीच दिव्याहून जलद मार्गावर वळवल्या असल्या, तरी प्रवासी अडकून पडले नसते.अॅप ठरले कुचकामी : कोणती गाडी कोणत्या स्थानकात आहे आणि ती पोचण्यास किती वेळ लागेल हे दर्र्शवणारे रेल्वेचे एनजीईएस हे अॅपही या आपत्तीच्या काळात कुचकामी ठरले. त्यावर जाऊन गाड्यांच्या वेळा तपासल्यावर एक-दोन गाड्या उशिरा आणि बाकी सर्व ‘राइट टाइम’ दाखवत होत्या.महिलाप्रवाशांचे हालखोळंबलेल्या गाड्यांत अडकलेल्या महिला प्रवाशांचे अतोनात हाल झाले. गाड्यांतून उड्या मारून उतरणे, पुन्हा चढणे यात त्यांची त्रेधा उडत होती. पुरूष प्रवाशांच्या मदतीने त्यांना नंतर उतरवण्यात आले.ठाण्यात झाली कोंडीकल्याणच्या दिशेने सोडल्या जाणाºया लोकलसाठी ठाण्यात संध्याकाळपर्यंत फक्त फलाट क्रमांक तीन उपलब्ध होता. पण तेथे एखादी गाडी येऊन, थांबून माघारी जाईपर्यंत पुढील गाडी अर्धा-अर्धा तास खोळंबून पडत होती. रात्री अकराला फलाट सहा आणि सातचा वापर करून कल्याणला काही गाड्या सोडण्यात आाल्या.
रेल्वेच्या घोळामुळेच प्रवासी अडकले, नेमकी माहिती देण्यातील अभावाचे पुन्हा घडले दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 6:03 AM