शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पाच पाड्यांवर टंचाईचे संकट, पाणीयोजना खर्चिक असल्याने प्रश्न सुटणे कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 12:59 AM

शहापूर तालुक्यातील कळमगाव-कानविंदे-पेंढरी ग्रामपंचायत हद्दीतील गावांत जशी पाणीटंचाई आहे, तशीच ती परिसरातील पाच पाड्यांवरही असून यावर मात करण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे

जनार्दन भेरे भातसानगर : शहापूर तालुक्यातील कळमगाव-कानविंदे-पेंढरी ग्रामपंचायत हद्दीतील गावांत जशी पाणीटंचाई आहे, तशीच ती परिसरातील पाच पाड्यांवरही असून यावर मात करण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.टोकरेपाडा, खरमेपाडा, हेदूचापाडा, चिंचपाडा, दुमाडपाडा हे डोंगरटेकडीवर वसलेले पाच पाडे असून या पाड्यांना जवळपास पाण्याचे काही स्रोतच नाहीत. त्यामुळे त्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. तानसा धरणाचे बॅक वॉटर येथून जवळपास दोन किमी अंतरावर आहे. त्यामुळे येथून पाणीयोजना खर्चिक तसेच जोखमीची असल्याने या पाड्यांचा पाणीप्रश्न सुटण्यास बराच अवधी लागणार असल्याचे चित्र आहे. हे पाडे एकमेकांपासून बऱ्याच अंतरावर असल्यानेही त्यांना नळपाणीपुरवठा करणे कष्टाचे ठरणार आहे. यंदा पाऊस लवकर गेल्याने तसेच भूगर्भाची पाणीपातळी खोलवर गेल्याने, विहिरीतील पाणी लवकर आटल्याने नेहमीपेक्षा यंदा लवकर टंचाई निर्माण झाली.

शहापूर तालुक्यातील ३२ गावे, ११० पाडे अशा १४२ गावपाड्यांत पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले असून यावर मात करण्यासाठी २४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. २०११ च्या जनगणनेनुसार गावपाड्यांना पाणीपुरवठा सुरू आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन हा पुरवठा करण्याची गावकऱ्यांची मागणी आहे.

तालुक्यातील गावपाड्यांतील लोकसंख्या वाढलेली असल्याने त्यानुसार पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. - एस. भोंडवे, ग्रामपंचायत सदस्यआज ज्या गावपाड्यांना टंचाई निर्माण झाली आहे, त्या सर्वांचे ठराव आले आहेत. त्यांना पाणीपुरवठा सुरू केला आहे.- एम.जी. आव्हाड, उपकार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग

टॅग्स :Waterपाणी