शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

शाळेच्याच फुगेवाल्याने धंदा मांडला...

By admin | Published: December 25, 2015 2:23 AM

वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त खेळमेळा आयोजित केला जातो. तसाच मेळा यंदाही सुरू होता. त्यासाठी ज्युनिअर आणि सीनिअर केजीतील ४०० मुले आणि साधारण ६००

आकाश गायकवाड, कल्याण वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त खेळमेळा आयोजित केला जातो. तसाच मेळा यंदाही सुरू होता. त्यासाठी ज्युनिअर आणि सीनिअर केजीतील ४०० मुले आणि साधारण ६०० पालक अशा हजारेक व्यक्ती उपस्थित होत्या. सकाळी १० च्या सुमारास सुरू झालेला हा आनंदमेळा दुपारी १ च्या दरम्यान संपला. त्याला शाळेचे व्यवस्थापक, प्रमुख पाहुणे म्हणून कल्याण पूर्वेतील सेंट मेरी शाळेतील लंगडीत राष्ट्रीयपदक मिळवलेले तन्मय बेळमकर आणि प्रेरणा दास हे लहान विद्यार्थीही उपस्थित होते. या कार्यक्रमानिमित्त हवेत सोडण्यासाठी, सजावटीसाठी शाळेच्या क्रीडांगणात फुगे लावले होते. लहान मुलांना गॅसचे फुगे देण्यासाठी शाळेतर्फेच खासगी फुगेवाला बोलवण्यात आला होता आणि तोच फुगेवाला तेथे फुगेविक्रीचा धंदा करू लागला. दरवेळी हा फुगेवाला शाळेच्या मुख्य गेटबाहेर असतो. मात्र, यंदा शाळेने फुगेविक्रेत्याला थेट क्र ीडांगणात बोलवल्याने पालकही आश्चर्य व्यक्त करीत होते. शाळेच्या ‘खेळमेळा’ कार्यक्र मात लंगडी, खोखो, दोरीच्या उड्या, धावणे, रिंगउड्या आदी खेळ पार पडले. साधारण १ नंतर छोटीछोटी मुले आणि पालक, मुलांचे नातलग, मित्र मंडळी घरी निघाले. त्याच वेळी शाळेच्या क्रीडांगणाबाहेर फुग्यांमध्ये गॅस भरणारा सिलिंडर आणि रंगीबेरंगी फुगे घेऊन रामदरस उभा होता.शाळेतील लहान मुलांनी पालकांकडे हट्ट करत या फुग्यांसाठी तेथे गर्दी सुरू केली. काही मुले-पालक फुगे घेऊन निघाले. त्याच वेळी अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका जबरदस्त होता की, फुगेवाला काही फूट उंच उडाला आणि शाळेच्या पत्र्यांना आपटून खाली कोसळला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्या वेळी फुगेवाल्याच्या भोवती असलेली, तेथून जाणारी मुले, पालक या दुर्घटनेत गंभीर जखमी झाले. गॅसमुळे त्यांचे डोळे, चेहरा, हाताला जखमा झाल्या. ते भाजले. या प्रकारानंतर शाळेत एकच घबराट पसरली. शिक्षक, पालकांचा आरडाओरडा, मुलांची रडारड यामुळे नेमके काय झाले आहे, तेच समजण्यास मार्ग नव्हता, अशी माहिती घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्या पालकांनी ‘लोकमत’ला दिली. घटनेचे गांभीर्य पाहता कोळसेवाडी पोलीस आणि ठाण्याचे बॉम्बशोधक-नाशक पथक यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. रस्त्यावर गॅसचे फुगे घेताय, सावधान!अनिकेत घमंडी ल्ल डोंबिवली अबालवृद्धांचे मन मोहित करणारे, लहानग्यांची नाराजी दूर करणारे फुगे पूर्वी हातपंपाने किंवा तोंडाने हवा भरून मिळत. आता उंचचउंच उडवायचे असल्याने त्यात गॅस भरला जातो. प्रामुख्याने शहरांमधील उद्यानांनजीक प्रवेशद्वारांजवळ, भाजी मार्केट, बसस्थानके, रेल्वे स्थानकांचा परिसर, शाळा सुटतांनाच्या वेळेत हे फुगेवाले आढळतात. पण, त्यांच्याजवळचा गॅस सिलिंडर किती सुरक्षित आहे, याची तपासणी कधीही केली जात नाही, हेच कल्याणच्या गुरुवारच्या घटनेवरून स्पष्ट झाले.कल्याण-डोंबिवली शहरांसह २७ गावांचा धांडोळा घेतला असता सर्व इंग्रजी माध्यमांच्या शाळांसह बहुतांश महापालिकेची उद्याने, भाजी मंडया, चित्रपटगृहासह सांस्कृतिक कार्यक्रमांच्या ठिकाणी सर्रास गॅसचे फुगे विके्रते ठाण मांडतात. दिवाळी आणि नाताळ या सणांसह अन्य उत्सवांच्या काळात विविध आकारांच्या फुग्यांच्या सजावटीची पद्धत रुढ होते आहे. तेथे गॅसने फुगे भरून अल्पावधीत सजावट करता येते. पण त्यामुळे सुरक्षा मात्र, धोक्यात येते.फुगेवाला कसा आला, माहीत नाही गेल्या १० वर्षांपासून आम्ही हा कार्यक्र म करतोय. त्यात मुले आणि पालक सहभाग घेतात. पण, फुगेवाल्याला आम्ही आतमध्ये बोलवले नव्हते. तो कसा आत आला, हे समजले नाही. हा प्रकार घडल्याने आम्ही खूप दु:खी झालो आहोत. ही सर्व माझी मुले आहेत. शाळा प्रशासन त्यांच्या उपचाराची जबाबदारी घेईल. - भारत जोगिंदरनाथ मलिक, संचालक, आर्य गुरुकुल शाळा