शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

वैद्य कुटुंबीयांच्या प्रामाणिकपणामुळे मिळाले चार लाखांचे सोन्याचे दागिने

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2021 1:50 AM

Thane News : पोलिसांनी सोमवारी ही बॅग ठाण्यातील कदम कुटुंबीयांकडे सुपूर्द केल्यामुळे वैद्य आणि जाधव यांच्या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक होत आहे.

ठाणे  - कोकणात जाताना राजाराणी एक्स्प्रेसमध्ये १४ हजारांची रोकड, चार लाखांचे दागिने आणि एक मोबाइल असा साडेचार लाखांचा ऐवज असलेली कदम कुटुंबीयांची बॅग वैद्य कुटुंबाला कुडाळमध्ये सापडली. ही बॅग त्यांनी ठाण्यातील शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन जाधव यांच्या मदतीने वर्तकनगर पोलीस ठाण्यात जमा केली. त्यानंतर पोलिसांनी सोमवारी ही बॅग ठाण्यातील कदम कुटुंबीयांकडे सुपूर्द केल्यामुळे वैद्य आणि जाधव यांच्या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक होत आहे.राजाराणी एक्स्प्रेसने कमलेश वैद्य आणि त्यांची पत्नी हे कुडाळ येथे मामाच्या कार्यासाठी एक आठवड्यापूर्वी गेले होते. त्याच कोकण रेल्वेच्या डब्यात कणकवलीला भगवती देवीच्या गोंधळाला निघालेले संजय कदम परिवार प्रवास करीत होते. चार बॅगा घेऊन प्रवास करणारे कदम कुटुंब हे कणकवलीत उतरले. उतरताना त्यांची सोन्याचे दागिने आणि रोकड असलेली बॅग रेल्वेतच राहिली. दरम्यान, ही बॅग वैद्य कुटुंबीयांना कुडाळमध्ये उतरताना सापडली. मात्र, तिकीट नसल्याने घाबरलेल्या वैद्य कुटुंबाने रेल्वे पोलिसांकडे बॅग न देता कार्य आटोपल्यानंतर ठाण्यात वर्तकनगर येथे ती बॅग आणली. बॅग उघडून पाहताच त्यात सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा ऐवज त्यांना आढळला. वैद्य कुटुंबाने वागळे इस्टेट येथील उपशाखाप्रमुख सचिन जाधव यांना ही माहिती दिली. त्यांनी नगरसेवक एकनाथ भोईर यांच्या मदतीने ती वर्तकनगर पोलिसांच्या स्वाधीन केली. बॅगेतील एका कार्डवरील क्रमांकाच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड आणि पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी कदम दाम्पत्याशी संपर्क साधला. त्यांना ठाण्यात बोलावून सोमवारी हा चार लाख रुपयांचा मुद्देमाल असलेली बॅग मालक कदम आणि त्यांच्या पत्नीच्या स्वाधीन केली. प्रामाणिक रिक्षाचालकामुळे महिलेला मिळाली पर्स ठाण्यातील रिक्षाचालक गणेश पवार यांच्या रिक्षात गांधीनगर येथून बसलेल्या प्राजक्ता जालनेकर (३०, रा. जोगेश्वरी, मुंबई) या त्यांची पर्स विसरल्या होत्या. रिक्षाचालकाने ती वाहतूक पोलिसांच्या मदतीने १ फेब्रुवारी रोजी प्राजक्ता यांच्या सुपूर्द केली. महत्त्वाची कागदपत्रे आणि काही रोकड असलेली ही पर्स सुखरूप मिळाल्यामुळे प्राजक्ता यांनी या रिक्षाचालकासह ठाणे पोलिसांचे आभार मानले आहेत. याबाबत त्यांनी ३१ जानेवारी रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. आपल्या रिक्षात महिला प्रवाशाची पर्स राहिल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रामाणिक रिक्षाचालक पवार यांनी त्यांचे ठाणे शहर पोलीस दलातील पोलीस अंमलदार मित्र तानाजी पाटील यांना याची माहिती दिली. त्यानंतर पाटील यांनी ही माहिती ठाणे शहर पोलीस नियंत्रण कक्षात दिली. उपनिरीक्षक तावरे यांच्या मदतीने पर्समधील कागदपत्रांच्या आधारे प्राजक्ता जालनेकर यांचा मोबाइल क्रमांक त्यांना मिळाला. त्यांना संपर्क करून १ फेब्रुवारी रोजी पर्स त्यांना सुपूर्द केली. 

टॅग्स :thaneठाणे