ठाणे - दिल्ली येथे संसदेचा दौरा करायला निघालेल्या ठाण्यातील शिवसेना नगरसेवकांचा जीव थोडक्यात बचावला आहे. सकाळी सव्वा दहाच्या दरम्यान गो एअर कंपनीच्या विमानाने मुंबई विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर ३५ ते ४० मिनिटांचे अंतर कापल्यानंतर विमानामध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता सावधगिरीचा उपाय म्हणून हे विमान पुन्हा मुंबई विमानतळावर उतरविण्यात आले. विमानामध्ये तब्बल ४० ते ४५ नगरसेवक आणि इतर पदाधिकारी प्रवास करत होते. प्रवास करत असलेल्या नगरसेवकांनी मुंबई विमानतळावर उतल्यावर सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतर त्यांना पुन्हा दुसऱ्या विमानाने दिल्लीला रवाना करण्यात आले. ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्यावतीने ठाण्यातील शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी यांच्यासाठी संसदेचे कामकाज कशा पद्धतीने चालते हे पाहण्यासाठी या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या अभ्यास दौऱ्यामध्ये ४० ते ४५ नगरसेवक प्रवास करत होते. स्वत: खासदार या विमानांमधून प्रवास करत नव्हते. तर शिवसेनेची एकही महिला नगरसेविका देखील सुदैवाने या विमानामध्ये प्रवास करत नव्हती.सकाळी विमानाने व्यविस्थत उड्डाण घेतल्यानंतर तब्बल ४० मिनिटांनी विमानामध्ये काही तरी बिघाड झाला असल्याची माहिती आम्हाला देण्यात आली. मात्र नेमका काय तांत्रिक बिघाड झाला आह यांची माहिती देण्यात येत नव्हती अशी प्रतिक्रिया या विमानामध्ये प्रवास करणारे शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे यांनी दिली आहे. त्यानंतर एका इंजिनामध्ये बिघाड झाल्याने ते पुन्हा मुंबईत उतरविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. सुदैवाने वैमानिकाने वेळेत सतर्कता दाखवल्यामुळे आमचे प्राण वाचले असल्याचे त्यांनी सांगितले. तर अचानक तांत्रिक बिघाड झाला आहे एवढीच माहिती आम्हाला देण्यात आल्यानंतर पुन्हा मुंबईला उतरवण्यात आले असल्याचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी सांगितले.सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी देखील आपण या दौऱ्याला जाणार होतो, मात्र काही कामानिमित्त आपल्याला जाण्यास जमले नसले तरी या प्रकारची चौकशी होईल अशी अपेक्षा असल्याची प्रतिक्रि या त्यांनी दिली आहे. दरम्यान दुपारी पावणेतीनच्या दरम्यान हे सर्व नगरसेवक दिल्लीला पोचले असल्याची माहिती दौऱ्यातील नगरसेवकांनी दिली आहे. दरम्यान या संदर्भात या विमानाचे लँडीग एमरजेन्सी करण्यात आलेले नसल्याची माहिती गो एअर कंपनीकडून देण्यात आली आहे. केवळ सावधगिरीचा उपाय म्हणून विमान सुखरुपपणे पुन्हा मुंबईला उतरविण्यात आल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले.
वैमानिकाने दाखविलेल्या सर्तकतेमुळे ठाण्यातील शिवसेनेचे सुमारे ४५ नगरसेवक सुखरुप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 17:23 IST
दिल्लाला जाणाऱ्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते विमान पुन्हा मुंबईत उतरविण्यात आले. सुदैवाने या विमानातून दिल्लीला संसदेचे कामकाज पाहण्यासाठी जात असलेल्या ठाण्यातील ४५ शिवसेना नगरसेवक हे वैमानिकाने दाखविलेल्या सर्तकतेमुळे बचावले आहेत.
वैमानिकाने दाखविलेल्या सर्तकतेमुळे ठाण्यातील शिवसेनेचे सुमारे ४५ नगरसेवक सुखरुप
ठळक मुद्देसंसदेचे कामकाज पाहण्यासाठी निघाले होते नगरसेवकविमानात झाला होता तांत्रिक बिघाड