ठाणे : जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुंबई, ठाणेसह जिल्ह्यातील शहरांना पाणी पुरवठा करणाºया धरणांमधील पाणी साठा झपाट्याने वाढत आहे. भातसा धरणात ४८.५१ टक्के तर बारवीत ५५.८५ टक्के पाणी साठा या मोठ्या जलाशयांमध्ये झाला आहे. याप्रमाणेच अन्यही धरणांमधील पाणी साठ्यातही समाधानकारक वाढ होत आहे. मंगळवारी, बुधवार या दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने धरणांचा साठा झपाट्याने वाढला आहे.
पावसाळा यंदा उशिराने सुरू झाल्यामुळे शहरी व ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करणाºया या धरणांमध्येही पाणी साठा वाढण्यास विलंब होत आहे. पण गेल्या दोन दिवसांपासूनच्या संततधार पावसाने या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे पाणी पातळी वाढली आहे. भातसा धरणात ४५६.९८ (४८.५१ टक्के) दलघमी. पाणी साठा तयार झाला आहे. भातसात आजपर्यंत सरासरी १०९१ मिमी. पाऊस पडला. तर बारवीत १८९.२५ (५५.८५ टक्के) साठा झाला. या धरणात १२८६मिमी. पाऊस आजपर्यंत पडला.
आंध्रा धरणात १३८.१९ (४०.७५ टक्के) दलघमी पाणी साठा झाला. यामध्ये आजपर्यंत ८७५ मिमी. पाऊस पडला. मुंबईला पाणी पुरवठा करणाºया तानसा धरणात१०३(७१ टक्के) दलघमी पाणीसाठा झाला आहे. मध्ये वैतरणात ५०.६९टक्के तर अप्पर वैतरणात ४१टक्के साठा तयार झालेला आहे. मोडक सागरमध्ये ६२.९९ टक्के पाणी साठा आजपर्यंत झाला आहे.