रणजीत इंगळे
ठाणे - ठाण्यात गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडी आणी रस्त्यावरील खड्ड्यामुळे ठाणेकर त्रस्त आहेत. कळवा पुलावर प्रचंड वाहतूककोंडी होत असते या वाहतूककोंडीतून सुटका होण्यासाठी महापालिकेने २०११ च्या आर्थिक वर्षात कळव्याच्या नवीन पुलासाठी १० कोटींची तरतुद केली होती. त्यानंतर आता या पुलासाठी १८३ कोटींचा खर्च केला गेला आहे. आता या पुलाच्या एका लेनचे काम पूर्ण झाले आहे. मात्र अद्यापही हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नाही. मुख्यमंत्र्याच्या शहरात असणारा या पुलाचे काम पूर्ण होऊनदेखील पुल बंद असल्याने मुख्यमंत्र्यांचे याकडे दुर्लक्ष होतय का अशी चर्चा ठाणेकरांत रंगली आहे.
अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी पाहणी करत २५ ऑगस्ट र्पयत येथील एका मार्गीकेचे काम पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला होता. त्यानंतर हि मार्गिका सुरु केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले होते. ठाण्याकडून विटाव्याकडे जाण्यासाठी हा वनवे पुल असणार आहे. तर विटाव्याकडून येणाऱ्या वाहनांसाठी जुना पुलाचा पर्याय ठेवण्यात आला आहे. ठाण्याकडून खारेगांव (मनिषा नगर) आणि विटाव्याच्या पुढे म्हणजेच ठाणो - बेलापुर दिशेला असा दोनही मार्गाने हा पुल खाली उतरणार आहे. तसेच कळव्याकडून ठाण्याकडे येतांना हा पुल साकेत, जेल तलाव आणि कोर्टनाका मार्गे ठाणो स्टेशनकडे खाली उतरणार आहे. केबल स्टेड टाईपचा हा पुल असून तो दिड किमीचा असणार आहे. दरम्यान कोरोनामुळे या पुलाच्या कामाचा वेग मंदावला होता. डिसेंबरमध्ये या पुलाच्या एक लेन खुली केली जाईल असा दावा देखील करण्यात आला होता. परंतु तो दावा देखील फोल ठरल्याचे दिसून आले.
कळवा खाडीवरील हा तिसरा पुल आता वाहतुकीसाठी तयार झाला आहे. शहरातील सध्याची परिस्थिती पाहता वाहतुक कोडीने लोक हैराण झाले आहेत. त्यात हा पुल खुला होत नसल्याने जुन्या पुलावर ताण येत असून वाहतुक कोंडी देखील होतांना दिसत आहे. त्यामुळे या खाडी पुलाची एक लेन तरी सुरु करण्यात यावी अशी मागणी लोकमतशी बोलताना माजी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. मुख्यमंत्री हे ठाण्याचे आहेत त्यामुळे संयम राखला आहे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे त्यांनी लवकर तोडगा काढावा, गणेशउत्सव जवळ आलेत वाहतूककोंडी होते त्यामुले लवकरात लवकरात हा पुल खुला करण्याची मागणी केलीय. तर दुसरकिडे शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी हा पुल लवकरात लवकर सुरु केला जाईल असे लोकमतशी बोलताना सांगितले. राजकीय कुरघोडीमुळे या पुलाच उदघाटन थांबलं आहे का अशी चर्चा ठाणेकरमध्ये रंगली आहे