शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
3
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
4
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
5
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
6
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
7
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
8
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
9
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
10
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
11
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
12
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
13
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
14
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
15
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
16
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
17
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
18
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
19
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमची सत्ता आल्यावर दिशा सालियान प्रकरणाची पुन्हा चौकशी लावणार: रामदास कदम

पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2024 6:01 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक मार्गात बदल केला होता. परिणामी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर साधारण ३० ते ३५ किलोमीटर अंतरावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : मुंबईहून नाशिकला किंवा नाशिकहून मुंबईला येताना दररोज हजारो अवजड वाहने मोटारी, रिक्षा, स्कूटर या छोट्या प्रवासी वाहनांची कोंडी करतात. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोडबंदर रोडवरील मैदानात सभा असल्याने तब्बल तीन हजार अवजड वाहने मुंबई-नाशिक महामार्गासह घाेडबंदर राेडवर थांबवून ठेवल्याने या अवजड वाहनांना वाकुल्या दाखवत माेटार, दुचाकीवरून नागरिकांनी सुसाट व सुखद प्रवासाचा अनुभव घेतला. 

पंतप्रधानांच्या सभेसाठी  ठाणे शहर पाेलिस आयुक्तालयातील अनेक मार्गांमध्ये बदल केल्याची माहिती पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी आधीच दिली हाेती. ठाणे शहर वाहतूक विभागात तीन राष्ट्रीय महामार्ग, तर एक राज्य महामार्गावरील  अवजड वाहने शुक्रवारी रात्रीपासून ठिकठिकाणी थांबवून ठेवली. गुजरात, मुंबईकडून घोडबंदर रोडमार्गे तसेच नाशिक, भिवंडीकडून नवी मुंबई, जेएनपीटीकडे आणि पश्चिम महाराष्ट्रात मालवाहतूक करणारी ही वाहने शहापूर, पडघा परिसरात महामार्गावरील माेकळ्या ठिकाणी थांबवून ठेवली हाेती. मुंब्रा बायपास आणि सरावली दरम्यान ही  अवजड मालवाहू वाहने थांबवण्यात आली हाेती. घाेडबंदर राेडवरील वाहने वसई परिसरातील चिंचाेटी, कामनजवळ अडवण्यात आली हाेती. ठाणे शहराजवळील फाऊंटन हाॅटेलजवळ वाहने थांबवून ठेवली हाेती. 

पंतप्रधानांचा दौरा झाल्यानंतरही शनिवारी रात्री १२ नंतर ही रोखलेली तीन हजार वाहने संध्याकाळी ७.३० नंतर ही अडकवून ठेवलेली वाहने साेडण्यात आली. त्यामुळे रात्री नऊ नंतर वाहतूककोंडी झाली. 

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहतूककोंडी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई, ठाण्याच्या दौऱ्यामुळे ठाणे व मुंबईत जाणाऱ्या वाहनांच्या वाहतूक मार्गात बदल केला होता. परिणामी या वाहतूक बदलामुळे शनिवारी सकाळी सहा वाजल्यापासून मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वर्सोवा पुलापासून ते शिरसाड मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. साधारण ३० ते ३५ किलोमीटर अंतरावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. या वाहतूक काेंडीमुळे बाहेरगावी तसेच नोकरीसाठी जाणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल झाले. पालघर जिल्ह्यात विविध देवींच्या दर्शनासाठी निघालेल्या पर्यटकांनाही कोंडीचा फटका बसला. मुंबई-ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वर्सोवा पूल ते चिंचोटी या दरम्यान वाहनांच्या रांगा दिसल्या.

नवी मुंबई-ठाणे रस्ता दिवसभर मोकळा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ठाणे दौऱ्यामुळे अवजड वाहनांना बंदी घातल्याने नवी मुंबई ते ठाणेकडे जाणारे रस्ते दिवसभर मोकळे दिसून आले. अनेक मार्गांवरील वाहतुकीत बदल करण्यात आले होते. जेएनपीटी चौक कर्जत मुरबाड शहापूर कसारा-इगतपुरी नाशिककडे जाण्यासाठी मार्गात बदल करण्यात आला होता.  जेएनपीटी चौक कर्जत, मुरबाड, शहापूर, वाडा, मनोर टोल नाका येथून गुजरातमार्गे तसेच जेएनपीटी पुणे एक्स्प्रेसमार्गे चाकण, नगर, नाशिक हायवेमार्गे इच्छित स्थळी जाण्यास वाहनांना मुभा देण्यात आली होती.

सभेवेळी १४५ जणांना त्रास

ठाण्यात शनिवारी दुपारी आयोजित केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या वेळी काही महिला आणि पुरुषांना रक्तदाब कमी होणे अथवा वाढणे आणि चक्कर येणे असा त्रास झाला. आरोग्य यंत्रणेमार्फत १४५ जणांवर तत्काळ उपचार करण्यात आल्यानंतर त्यांना घरी सोडले. घोडबंदर भागातील बोरीवडे येथे मोदींच्या कार्यक्रमासाठी दोन हजार वाहनांमधून सुमारे एक लाख नागरिक आले होते. येणाऱ्यांना जेवणाचे पाकीट, पाणी देण्यात आले. येथे मोठा तंबू बांधला होता. त्यात हवा खेळती राहील, याची व्यवस्था होती. तरी काहींना त्रास झाला. त्यांना  ओआरएसमिश्रित पाणी दिल्याचे आरोग्य यंत्रणेने सांगितले.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीTrafficवाहतूक कोंडी