सुरेश लोखंडे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : जिल्ह्यात पारंपारीक पध्दतीने चिखलणी करून रोपांच्च्या लावणीची भात शेती शेतकºयांना खर्चीक आहे. खर्चाच्या तुलनेत उत्पन्नही कमी असल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे. अधीक मेहनत, मजुरांची जुळवाजुळव आदींमुळे जिल्ह्यातील भात शेतीपासून दुरावत असलेल्या शेतकºयांना यंदाच्या ‘सगुणा भात पेरणी’ची पध्दत अल्प खर्च, कमी मेहनत आणि अधीक उत्पादनाच्या दृष्टीने भात पीक दर्जेदार व जोमाने वाढत आहे. तर लागवड केलेले भात रोप आजपर्यंतही जमिनीशी एकरूप झाले नाही. एवढेच काय तर काही ठिकाणी लागवडीही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे ही पारंपारीक पध्दत कालबाह्य ठरण्याचे चिन्ह आहे.
जिल्ह्याचे झपाट्याने नागरीकरण होत असून रोजगाराच्या संधी मोठ्याप्रमाणात आहे. वाढत्या दराने रोजगार मिळत असल्यामुळे जिल्ह्यातील गांवखेड्यांच्या शेतीला मजूरही वेळेवर मिळत नाही. भात शेतीतील उत्पादनाचा विचार करता शेत मजूर लावणे शेतकºयांना डोईजड झाले आहे. वाढत्या महागाईमुळे बीबियाणे, खते, फवारणी औषधीच्या किंमती आवाक्याच्या बाहेर गेल्या. त्यात रोगराई आणि अवकाळी पावसाचा तडाक्यात पीक सापडताच हातचे पीक जाऊन शेतकºयांना नुकसानीला तोंड द्यावे लागत असल्याचे वास्तव आहे.या विविध समस्या, खर्च आणि अवकाळी पावसाच्या आधी भाताचे पीक घरात येणाºया ‘सगुणा राईस टेक्नीक’म्हणजे ‘एसआरटी’ पध्दतीची भात पेरणी यंदा जिल्हह्यातील बहुतांशी शेतकºयांनी केली आहे. त्यांच्या या पध्दतीच्या भाताचे पीक लागवणीच्या भातापेक्षा कितीतरी पटीने दर्जेदार व जोरदार बहरले असून वाढीव उत्पादनाच्या अपेक्षा वाढल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे यांनी स्पष्ट केले.
या एसआरटी भात पेरणीमुळे शेतकºयांना २० वर्षे शेत नांगरण्याची गरज नाही. पारंपारीक पध्दतीप्रमाणे चिखणी करण्याची गरज नाही. याशिवाय कमी मेहनतीत, कमी खर्चात कमी पावसात अधीक भात उत्पादन या एसआरटीच्या पध्दतीमुळे शेतकºयांना मिळणार असल्याचा दुजोरा कुटे यांनी दिला आहे. भात पेरणीच्या वेळीच खताचा वापर करावा लागणाºया या पध्दतीने शेत जमिनीचा कसदारपणा टिकून राहतो. रोगराई, कीडीचा प्रादुर्भाव नाही. खर्चाची आणि मेहनतीची बचत झाल्याचे सुतोवाच शेतकºयांकडून करण्यात येत आहे. अंबरनाथ तालुक्यातील कुडेरान या गांव परिसरात शेतकºयांनी एसआरटीच्या भाताचे संवर्धन सुरू केले आहे. याप्रमाणे शहापूर येथील अष्ठे येथील शेतकरी बबन करण, मुकुंद करण, मौजे भावसे येथील संजय भोये आदीं शेतकºयांच्या शेतातील या भात पिकाचा दर्जा उत्तम आहे. कीड रोग मुक्त असून शेत हिरवेगार झाले आहे. जमिनीतील अधिक सुपीक जमीन कायमस्वरूपी आहे.
या एसआरटीच्या तांदूळ रोपांची पाने पारंपारिक पद्धतीने त्यांच्या समकक्षांपेक्षा जास्त रुंद आणि सूर्यप्रकाशाकडे जास्त डोललेली आहेत. त्यामुळे ते अधिक बायोमास तयार करण्याची शक्यता आहे, म्हणजे जास्त उत्पादन. एसआरटीमध्ये ‘जोमदार एकरूपता’ आणण्याची क्षमता आहे. मातीच्या सर्व प्रकारांमध्ये अधीक उत्पन्न मिळवणे अगदी निकृष्ट मातीतही शक्य होत आहे. पारंपारीक पध्दतीच्या भात लागवडीमध्ये कमी उत्पादन, जास्त लागवडीचा खर्च असे विविध दोष आहेत. त्यामुळे ही भात शेती पावसाळ्याच्या उत्तरार्धात किफायतशीर आणि व्यवहार्य नसते. मात्र एसआरटीच्या या भात पीक पद्धतीत शेतकºयांनी मातीची मशागत करून फक्त एकदाच उंच बेड तयार करावे लागत आहे. खरीप हंगामाच्या भातानंतर विविध आवर्तन पिके घेण्यासाठी शेतकºयांना या मातीच्या उंच बेडचा म्हणजे वाफ्यांचा कायमस्वरूपी वापर करता येत आहे. याशिवाय खरीप भात कापणीनंतर लगेचच म्हणजे आॅक्टोबरच्या सर्वोत्तम कालावधीत अन्य पिकांसाठी शेत जमिनीचा वापर करता येतो. या कालावधीत जमिनीत ओलावा टिकून राहणे सहज शक्य आहे.