शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
6
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
7
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
8
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
9
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
10
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
11
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
12
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
13
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
14
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
15
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
16
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
17
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
18
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
19
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
20
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला

वाहतूक कोंडीमुळे ठाणे शहर गुदमरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 2:42 AM

ठाणे शहरातील घोडबंदर मार्ग आणि भिवंडीतील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे जिल्ह्यातील शेकडो नागरिक सोमवारी सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडीत अडकल्याचे चित्र होते.

ठाणे : ठाणे शहरातील घोडबंदर मार्ग आणि भिवंडीतील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे जिल्ह्यातील शेकडो नागरिक सोमवारी सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडीत अडकल्याचे चित्र होते. त्यातच स्कूलबसही अडकल्याने विद्यार्थ्यांचे अतोनात हाल झाले. या कोंडीमुळे हॉर्नच्या कर्णकर्कश आवाजात एकीकडे कानठळ्या बसत असताना दुसरीकडे धुराने श्वासही कोंडला गेला. महापालिका, सार्वजनिक बांधकाम खात्यासह एमएसआरडीच्या नाकर्तेपणामुळे जिल्ह्यातील बहुतेक रस्त्यांवर झालेली ही कोंडी काही ठिकाणी वाहतूक नियमन करून तर काही ठिकाणी रस्त्यांवरील खड्डे बुजवून सोडवून शहर वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचा मार्ग मोकळा केला.सोमवारी रात्री माळशेज घाटात पुन्हा दरड कोसळली. सुदैवाने घाटात पर्यटकांना जिल्हाधिकाऱ्यांनी ३० जुलैपर्यंत मनाई केल्याने आणि दरड कोसळतेवेळी कोणतेही वाहन नसल्याने कुणीही जखमी झाले नाही. मात्र, संध्याकाळी ती कोसळल्याने अंधारामुळे मदत कार्य थांबले आहे.>नाशिक-गुजरातकडे जाणारी वाहने अडकलीठाणेमार्गे नाशिकसह गुजरात, पालघर, बोरिवलीकडे आणि ठाण्यातून मुलुंडमार्गे मुंबईकडे जाणारी सार्वजनिक आणि खासगी वाहनेही या कोंडीत अडकली होती. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अनेक शाळा सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळा असल्यामुळे बहुतांश स्कूलबस या कोंडीत होत्या.त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनाही फटका बसला. नौपाडा वाहतूक शाखेचे निरीक्षक दिगंबर भदाणे, कासारवडवलीचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश पाटील यांचे पथक भरपावसात कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्नशील होते. हीच परिस्थिती भिवंडीतही पाहायला मिळाली. नारपोली, कोनगाव या भागांत अनेक कंपन्यांची गोदामे असल्याने शेकडो वाहनांची वर्दळ या भागातून असते.नारपोली भागात रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडल्यामुळे सकाळी ९ ते १२ या काळात भिवंडीतही मोठी वाहतूककोंडी होते. भिवंडीच्या नारपोली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक रमेश भामे यांच्या पथकाने मात्र पुढाकार घेऊन या मार्गावरील अनेक खड्डे बुजवून वाहतूककोंडी सोडवण्याचा प्रयत्न केला.>कोनवगळता इतरत्र खड्डेच खड्डेभिवंडीच्या कोनगाव परिसरात वारंवार खड्ड्यांमुळे होणारी वाहतूककोंडी लक्षात घेऊन ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी स्वत: रस्त्यावर उभे राहून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना खड्डे बुजवण्याचे आदेश दिले. हे काम मार्गी लागेपर्यंत शिंदे स्पॉटवरच असल्यामुळे अधिकाºयांची चांगलीच धावपळ उडाली होती. मात्र, जिल्ह्यातील महापे-शीळ-कल्याण रस्ता, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भार्इंदरसह शहापूर, मुरबाड, उल्हासनगर शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील खड्ड्यांकडे अद्यापही संबंधित यंत्रणांनी लक्ष न दिल्याने सोमवारी या सर्वच मार्गांवर वाहतूककोंडी होती.>ठाणे शहराला वाहनांचा विळखाशहरातील मुलुंड टोलनाका ते घोडबंदर रोडवरील गायमुख या शेवटच्या टोकापर्यंत साधारण चार ते पाच किलोमीटरपर्यंत सकाळी ८ ते १० आणि दुपारी १२ ते १.३० आणि सायंकाळी ६ ते रात्री ८.३० या वेळेमध्ये वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या.भरपावसामध्ये वाहतुकीचे नियमन करताना वाहतूक पोलिसांची मात्र चांगलीच कसरत होत होती. तरीही, वाहतूक मदतनीस यांच्या मदतीने वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू होते.परंतु, कोपरी येथील टोलनाका, नितीन ते कापूरबावडी मार्गावर कापूरबावडी जंक्शन आणि कासारवडवली भागातील उड्डाणपुलाजवळ तसेच नितीन ते कॅडबरी, ठाणे-बेलापूर मार्गावरील खड्ड्यांमुळे सकाळच्या वाहतुकीचा वेग चांगलाच मंदावला होता.त्यातच मुसळधार पाऊसही सुरू असल्यामुळे चालकांना मार्गक्रमण करताना मोठ्या अडचणी येत होत्या. त्यामुळे कोपरी ते नितीन कंपनी आणि माजिवडा ते पातलीपाडा आणि कासारवडवली ते गायमुखपर्यंतच्या मार्गावर मोठीच कोंडी झाली होती.५अनेक रिक्षा, बस आणि खासगी बसही अर्धाअर्धा तास एकाच जागी असल्यामुळे बाजारहाटसाठी आणि सकाळी कामावर जाण्यासाठी बाहेर पडलेले चाकरमानी दोन ते तीन तास वाहतूककोंडीत अडकले होते.>ंमुसळधार पाऊस, त्यात रस्त्यांवर अनेक ठिकाणी पडलेले खड्डे यामुळे घोडबंदर रोडवरील कोपरी टोलनाका, कापूरबावडी आणि घोडबंदर ते ठाण्याकडे येणाºया मार्गावर सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत वाहतूककोंडी झाली होती. परंतु, भरपावसातही वाहतूक पोलीस आणि वॉर्डन यांनी नियमनाचे काम करून वाहतूक सुरळीत केली.- बाबाजी आव्हाड, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा,ठाणे शहर

टॅग्स :thaneठाणे