मीरारोड - ऐन दिवाळी पाडव्याच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मीरा भार्इंदर मध्ये जेमतेम १५ मिनीटांच्या उद्घाटन कार्यक्रमांसाठी आले असता त्यांच्या येण्या जाण्याच्या मार्गावरील उभी केलेली वाहनं, फेरीवाले, मंडप आदी हटवण्यात आले होते. दोन वेळा रस्त्यांची सफाई करण्यात आली. पण रिक्षा, बस आदी सार्वजनिक वाहतुक सुमारे ४ तास बंद करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरीकांना लहान मुलं, वृध्द आदींना घेऊन पायपीट करावी लागली. सणासुदीत हाल झाल्याने नागरीकांमधुन तीव्र संताप व्यक्त होत होता. तर मुख्यमंत्र्यांच्या मार्गावर दोन वेळा साफसफाई केली जात असताना अंतर्गत मार्गावर मात्र कच-याच्या ढिगा-यातुन नागरीकांना मार्ग काढावा लागत होता.भार्इंदर रेल्वे स्थानका जवळील पुर्व पश्चिम जोडणा-या शहिद भगतसिंह भुयारी मार्ग व मीरारोड रेल्वे स्थानक परिसर सुशोभिकरणाचे उदघाटन यासाठी मुख्यमंत्री हे भार्इंदर येथे सायंकाळी ६ वा. तर मीरारोड येथे ७ वा. येणार होते. परंतु भार्इंदर येथेच मुख्यमंत्री तब्बल दोन तास उशीराने म्हणजे सव्वा आठच्या सुमारास आले. जेमतेम १० मीनीटात उद्घाटन करुन ते भुयारी मार्गा तुनच भार्इंदर पुर्वे वरुन मीरारोड स्थानक येथे गेले. तेथे देखील ते जेमतेम ५ मीनीटंच थांबले.पण मुख्यमंत्र्यांच्या या १५ मिनीटांच्या दोन उद्घाटन कार्यक्रमांसाठी नागरीकांना मात्र फारच मनस्ताप सहन करावा लागला. भार्इंदर पश्चिमेस रेल्वे स्थानक येथुन येणारे जाणरे प्रवाशी हे अगदी भार्इंदर पश्चिम, मॅक्सस मॉल, मुर्धा ते थेट उत्तन - चौक व गोराई पर्यंतचे असतात. रेल्वे स्थानका बाहेरुन बस, रीक्षा या शिवाय लोकांना दुचरा पर्याय नसतो.पण मुख्यमंत्री येणार म्हणुन पोलीसांनी सुमारे ४ वाजल्या पासुनच एमबीएमटी, बेस्ट आदी सार्वजनिक परिवहन उपक्रमाच्या बसच बंद करुन टाकल्या. शिवाय रिक्षा देखील बंद केल्या. सुट्टी दिवस व सणासुदी निमीत्त बाहेर पडलेल्या वृध्द, महिला, मुलं आदींसह नागरीकांना ये - जाण्यासाठी वाहनच नसल्याने अक्षरश: पायपीट करावी लागली. वृध्द, अपंग, महिला व मुलांचे तर खुपच हाल झाले.भार्इंदर पुर्व व मीरारोड भागात देखील परिस्थती वेगळी नव्हती. ऐन सणासुदीच्या दिवसात नाहक पायपीट करावी लागल्याने नागरीकां मधुन संताप व्यक्त होत होता.मुख्यमंत्र्यांचा ताफा ज्या मार्गावरुन जाणार त्या मार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या चारचाकी, दुचाकी गाड्यांना हटवण्याचे आवाहन पोलीसांनी सकाळ पासुनच चालवले होते. काही ठिकाणी वाहनं हटवण्यात देखील आली. शिवाय फेरीवाले, हातगाडीवाले आदींना मज्जाव करण्यात आला होता. काही ठिकाणी तर दिवाळी निमीत्त महापालिकेच दुकाना बाहेर मंडप टाकण्याची परवानगी दिलेली असताना मंडप काढण्याचा प्रकार झाला. रीक्षा चालकांसह अनेक व्यावसायीक, परिवहन उपक्रम आदींना देखील आर्थिक नुकसान सोसावे लागले.मुख्यमंत्री ज्या मार्गा वरुन जाणार त्या मार्गावर सकाळी नेहमी प्रमाणे साफसफाई करण्यात आली होतीच. पण दुपार नंतर पुन्हा एकदा रस्ते चकाचक करण्यात आले. त्यासाठी सफाई कामगारांना सुट्टी न देता थांबवण्यात आले होते. एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या मार्गावर झाडलोट जोरात करुन रस्ते चकाचक केली जात असताना अंतर्गत रस्त्यावर मात्र कचरयाचे ढिग पडलेले होते. ओला व सुका कचरा वेगळा केला नाही म्हणुन पालिकेने कचरा उचलणे बंद केल्याने रस्त्यावरच पडलेल्या कचरयाच्या ढिगातुन नागरीक वाट काढत असताना दिसत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मीरा रोड भेटीमुळे लहान मुलं, वृध्द आदींना करावी लागली पायपीट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2017 2:56 PM