शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

डंपिंगवर खच ‘प्लास्टिक’ पिशव्यांचा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 5:02 PM

कल्याण: केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापनाचे एकिकडे तीन-तेरा वाजले असताना दुसरीकडे प्लास्टिक बंदीची घोषणा सत्ताधारी शिवसेना आणि केडीएमसी प्रशासनाकडून करण्यात आली. मात्र ही घोषणा कागदोपत्रीच राहील्याचे भयावह चित्र डंपिंगवर आढळुन आलेल्या प्लास्टिक पिशव्यांच्या पडलेल्या खचावरून दिसून येते. हे वास्तव पाहता प्लास्टिक मुक्तीची घोषणा करून प्रशासनाने काय साध्य केले? असा सवाल उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देप्लास्टिक बंदी कागदावरच

कल्याण: केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापनाचे एकिकडे तीन-तेरा वाजले असताना दुसरीकडे प्लास्टिक बंदीची घोषणा सत्ताधारी शिवसेना आणि केडीएमसी प्रशासनाकडून करण्यात आली. मात्र ही घोषणा कागदोपत्रीच राहील्याचे भयावह चित्र डंपिंगवर आढळुन आलेल्या प्लास्टिक पिशव्यांच्या पडलेल्या खचावरून दिसून येते. हे वास्तव पाहता प्लास्टिक मुक्तीची घोषणा करून प्रशासनाने काय साध्य केले? असा सवाल उपस्थित होत आहे.केडीएमसी परिक्षेत्रात कच-याचा प्रश्न दिवसागणिक गंभीर बनत चालला आहे. या घनकच-याच्या विल्हेवाटीसाठी उपाय सूचविण्याच्या अनुषंगाने महापालिकेतील अधिकारी,पदाधिकारी आणि शहरातील काही सामाजिक संस्था यांची एकत्रिक बैठक महापौर देवळेकर यांनी २२ जूनला डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिरात घेतली होती. या बैठकीला वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे हे देखील उपस्थित होते. वेंगुर्ले नगरपरिषदेच्या धर्तीवर ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांसह सर्वच प्रकारच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्याच्या कृतीची केडीएमसी क्षेत्रातही अंमलबजावणी व्हावी अशी मागणी यावेळी उपस्थित मान्यवर आणि संस्थांकडून करण्यात आली होती. ही मागणी महापौरांकडून मान्य करण्यात आली तसेच याच्या अंमलबजावणीसाठी लागणारा अवधी पाहता १५ जुलै पासून ही बंदी अंमलात आणली जाईल अशी घोषणाही त्यांनी त्यावेळी केली होती. परंतू याबाबतची जनजागृती करण्याच्या अनुषंगाने कोणतीही पावले केडीएमसीकडून त्यावेळी उचलली गेलेली नव्हती आता देखील हेच चित्र आहे. केवळ आपल्या महापालिकेने अशी बंदी घालून फारसा उपयोग होणार नाही त्यासाठी राज्यभरात प्लास्टिकचा वापर, वाहतूक, संग्रह, निर्मिती-आयातींवर बंदी घालण्याची आवश्यकता असून त्यासाठी राज्यसरकारला विनंती करणारा ठराव करून पाठवावा असे पत्र सहयोग सामाजिक संस्था या संघटनेकडूनही त्यावेळी महापौर देवळेकरांना सादर करण्यात आले होते. १५ जुलै च्या बंदीबाबत कल्याण डोंबिवली शहरात जनजागृती अद्यापपर्यंत का झालेली नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले होते. तर १५ जुलैपासून प्लास्टीक बंदीची घोषणा करणा-या महापौरांनी त्याच्या ठोस अंमलबजावणीला थोडा कालावधी लागेल असे स्पष्टीकरण दिले होते. परंतू आजमितीला फेब्रुवारी महिना उलटलातरी प्लास्टिक बंदी ही प्रभावीपणे महापालिका क्षेत्रात लागू झालेली नाही हे आधारवाडी डंपिंगवरील चित्र पाहता स्पष्ट होते. डंपिंगवर कचरा डंप करण्यासाठी येत असलेल्या ट्रक आणि डंपरमधून मोठया प्रमाणावर प्लास्टिकचाच कचरा पडत असल्याने याठिकाणी सर्वत्र प्लास्टिकच पहावयास मिळत आहे. यावरून जाहीर करण्यात आलेल्या प्लास्टिक बंदीचा फज्जा उडाल्याचे समोर आले आहे. दुकानांमधूनही छुप्या पध्दतीने ग्राहकांना प्लास्टिकच्या पिशव्या दिल्या जात आहेत. उन्हाळयात कचरा डंपिंगला आग लागण्याचे सत्र झाले असताना या प्लास्टिकच्या कच-यामुळे ही आग अनेक तास धुमसत राहत असल्याचेही पहावयास मिळत आहे.कचरावेचकांची झुंबड कायमजेसीबीचा पंजा लागल्याने कचरा वेचणारी बानू वागे ही तरूणी गंभीर जखमी झाल्याची घटना आॅगस्ट महिन्यात आधारवाडी डंपिंगवर घडली होती. त्यावेळी स्थानिकांकडून कच-याची वाहने रोखल्याचा प्रकार घडला होता. घटनेनंतरही कचरावेचकांची झुंबड या डंपिंग ग्राऊंडवर कायम दिसत आहे. कचरा वाहून आणणा-या वाहनांमधून मोठया प्रमाणावर प्लास्टिक कचरा बाहेर पडत असल्याने प्लास्टिक वेचण्यासाठी त्याच्या अवतीभवती कचरावेचकांची गर्दी पहावयास मिळते. डंपिंगवर जमा होणारा कचरा समपातळीत आणण्यासाठी काम करणा-या जेसीबीच्या भोवताली बिनदिककतपणे कचरावेचकांचा गोतावळा पाहता आॅगस्टमध्ये घडलेल्या अपघाताची पुनरावृत्ती घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.कारवाई सुरू असल्याचा दावाआमची कारवाई सुरू असून गेले वर्षभरात आम्ही दिड लाखांचा दंड वसुल केला आहे. जर डंपिंगवर प्लास्टिकचा कचरा पडत असेलतर कारवाई व्यापक करावी लागेल. दोन महिन्यापुर्वी प्लास्टिकच्या उत्पादनावर सरकारने बंदी घातली आहे. त्यामुळे याचा परिणाम काही दिवसात दिसून येईल अशी प्रतिक्रिया केडीएमसी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी दिली. 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीthakurliठाकुर्ली