शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
8
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
9
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
10
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
12
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
13
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
14
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
15
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
16
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
17
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
18
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
19
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
20
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द

शीळ येथे डम्पिंगला तत्त्वत: मान्यता

By admin | Published: July 25, 2015 4:09 AM

ठाणे महापालिकेने सुरू केलेल्या ओला, सुका कचरा मोहिमेत अखेर ठाण्यातील १०० हून अधिक सोसायट्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार

ठाणे : ठाणे महापालिकेने सुरू केलेल्या ओला, सुका कचरा मोहिमेत अखेर ठाण्यातील १०० हून अधिक सोसायट्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार, आता या सोसायट्यांकडून कचऱ्याचे वर्गीकरण करूनच पालिका आता कचरा गोळा करीत आहे. सध्या पालिका या सोसायट्यांच्या माध्यमातून ५० टन कचरा गोळा करीत असून तो सीपी तलाव येथे टाकत आहे. परंतु, आता पर्यावरण विभागाने शीळच्या जागेला तत्त्वत: मंजुरी दिली असून पुढील महिन्यापासून या भागात खतनिर्मिती प्रकल्प राबविला जाणार आहे. शहरात आजघडीला ६५० मेट्रीक टन कचऱ्याची निर्मिती होते. तो दिव्यातील एका खाजगी जागेवर टाकला जात आहे. शिवाय, पालिकेने तळोजा येथील सामायिक भरावभूमीत सहभागी होण्यासाठी पावले उचलली आहेत. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार घनकचरा व्यवस्थापन नियम हाताळणी व व्यवस्थापन २००० नुसार घनकचरा निर्माण करणाऱ्या प्रत्येक घटकाने ओला व सुका कचरा वर्गीकरण करणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार, एप्रिल महिन्यात पालिकेने सोसायट्यांपर्यंत जाऊन जनजागृती सुरू करून प्रत्येक सोसायटीला नोटीस बजावली होती. त्याद्वारे जे ओला, सुका कचरा वेगळा करणार नाहीत, त्यांचा कचराच उचलला जाणार नसल्याचा इशारा पालिकेच्या घनकचरा विभागाने दिला होता. त्यानुसार, काही सोसायट्यांचा कचराही उचलणे पालिकेने बंद केले होते. अखेर, या सोसायट्यांनीदेखील यात सहभाग घेऊन आता ही मोहीम यशस्वी करण्यासाठी १०० सोसायट्यांनी साथ दिली आहे. दरम्यान, तीन सोसायट्यांनी यापूर्वीच ओला, सुका कचरा वेगळा करून आपल्याच सोसायटी आवारात या कचऱ्याची विल्हेवाट लावली आहे. त्यानुसार, इतर सोसायटीधारकांनी अशा प्रकारे कचऱ्याची विल्हेवाट लावली तर त्यांना मालमत्ता करात पाच टक्के सूट दिली जाईल, असे पालिकेच्या घनकचरा विभागाने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)