शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत राडा! ठाकरे-शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, मध्यरात्री वातावरण तापलं!
2
माझ्याकडे महाराष्ट्राचे सत्यात उतरणारे स्वप्न, माझा कम्फर्ट भाजपसोबत; राज ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका
3
आजचे राशीभविष्य - १३ नोव्हेंबर २०२४, लाभदायी दिवस, नोकरीत यश मिळेल, घरातील वातावरण सुखद राहील
4
झारखंडमध्ये आज मतदान,  १० राज्यांत होणार पोटनिवडणूक
5
मराठा समाजाची कांड्यांवर मोजण्याइतकी आहेत मतं; भाजपच्या बबनराव लोणीकरांचे वादग्रस्त वक्तव्य
6
आजचा अग्रलेख: भुजबळ ‘सीएम’ का झाले नाहीत?
7
शिवाजी पार्कवर उद्धवसेना, मनसेची सभा होणार?; नगरविकास खात्याच्या निर्णयाकडे लक्ष
8
जगातले दुश्मन एकत्र येतात तर आम्ही एकत्र येण्यावर चर्चा तर हवी; 'लोकमत'च्या मुलाखतीत राज ठाकरेंचं वक्तव्य
9
भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा शिंदेसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा
10
उठा उठा थंडी आली, स्वेटर घालायची वेळ झाली; मुंबई २० अंशांवर, राज्यात थंडीचा कडाका होतोय सुरू!
11
२० वर्षांत मतदार नेमके कुणाकडे गेले? २००४ ते २०१९ मध्ये काय घडलं?; जाणून घ्या आकडेवारी
12
२ हजारांहून अधिक मतदार सध्या कामानिमित्त परदेशात
13
मतदान केंद्रांवर ‘सबकुछ महिला’: मतदान वाढणार?; राज्यात ४२६ केंद्रांवर महिला अधिकारी, कर्मचारी सज्ज
14
महागडी फी भरून शाळेत काय मिळते? - निराशा!
15
दिव्यांग, ज्येष्ठांना मतदानाला आणण्यासाठी विशेष सोय; सक्षम ॲपवर नाव नोंदवण्याचे आवाहन
16
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
17
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
19
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
20
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस

सुटीमध्ये काम केल्यास कामगारांना दुप्पट वेतन

By admin | Published: July 18, 2015 11:54 PM

ठाणे महापालिकेच्या कंत्राटी कामगारांना यापुढे सार्वजनिक सुट्यांमध्ये काम केल्यास त्या दिवसाचे दुप्पट वेतन आणि वर्षातून २१ दिवस सुटी न घेतल्यास त्याचे वेतनदेखील

ठाणे : ठाणे महापालिकेच्या कंत्राटी कामगारांना यापुढे सार्वजनिक सुट्यांमध्ये काम केल्यास त्या दिवसाचे दुप्पट वेतन आणि वर्षातून २१ दिवस सुटी न घेतल्यास त्याचे वेतनदेखील देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कामगार उपायुक्तांकडे नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतल्याची माहिती म्युनिसिपल लेबर युनियनने दिली. यामुळे पालिकेच्या विविध आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ठाणे महापालिकेच्या विविध विभागांमध्ये हजारोंच्या संख्येने कंत्राटी कामगार आहेत. २६ जानेवारी, १ मे, १५ आॅगस्ट आणि २ आॅक्टोबर या चार सार्वजनिक सुट्या वगळता इतर सर्व सुट्यांचा आनंद ते घेत असतात. कंत्राटी कामगारांना मात्र या वेळी काम करावे लागत होते. त्यांना २१ दिवसांच्या भरपगारी रजेची रक्कम आणि या चार सार्वजनिक सुट्या मिळत नसल्याची तक्र ार म्युनिसिपल लेबर युनियनचे कार्याध्यक्ष रवी राव यांनी ठाण्याच्या कामगार उपायुक्तांकडे केली होती. यासंदर्भात त्यांच्याकडे युनियनची नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. कंत्राटी कामगारांना देय असलेल्या चार सार्वजनिक सुट्यांबाबत चर्चा होऊन कामगारांनी त्या दिवशी काम केल्यास त्यांना दुप्पट पगार आणि तीन दिवसांच्या आत १ पर्यायी रजादेण्याची कार्यवाही करण्याचे प्रशासनाने मान्य केल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)