कल्याण : गतवर्षी कोरोनाची पहिली लाट आल्यापासून कल्याण पूर्व येथील नांदिवली परिसरातील किशोर सातपुते या २४ वर्षीय तरुणाने त्याच्या मित्राच्या मदतीने आतापर्यंत ७०० जणांना रक्त मिळवून दिले तर ५०० कोरोना रुग्णांना प्लाझ्मा डोनर उपलब्ध करून दिले.
मागच्या वर्षी कोरोना काळात लॉकडाऊन लागला. त्यावेळी रक्तदान शिबिर आयोजित केले जात नव्हते. त्यामुळे रक्ताची चणचण भासत होती. परिस्थिती बिकट आणि मार्ग काही नाही. रक्त मिळत नाही. तर कोरोना रुग्णांना प्लाझ्मा डोनर मिळत नव्हते. सोशल मीडियावर रक्त हवे आहे. प्लाझ्मा डोनर हवा आहे असे मेसेज येत होते. त्यातून किशोरचे मन अस्वस्थ होऊ लागले. त्याचवेळी एक मेसेज सोशल मीडियावर आाला की, एका गरोदर महिलेस रक्ताची गरज आहे. मग मित्रांच्या ग्रुपमध्ये हा मेसज फिरला. तिला रक्त उपलब्ध करून देता आले. राज्यभरातील रक्तदान करू इच्छिणारे आणि प्लाझ्मा डोनरची यादी तयार केली. त्यांचे नंबर मिळविले. हा सगळा डेटा एक्सेल शीटमध्ये तयार केला. या कामात किशोरचा मित्र ऋषी साबळे याची भक्कम साथ मिळाली. ऋषी हा नवी मुंबईत राहणारा. मात्र कोरोनामुळे तो त्याच्या गावी जुन्नरला राहत आहे. गावावरून किशोरच्या सानिध्यात राहून रक्तदान आणि प्लाझ्मा डोनर मिळवून देण्याचे नियोजन पाहत आहे.
किशोरने डोंबिवलीच्या पेंढरकर कॉलेजमध्ये एसवायबीए केले आहे. काही कारणास्तव त्याला पदवी परीक्षा देता आलेली नाही. त्याच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र लहानपणीच हरपले. त्याच्या आईचे नांदिवली परिसरात एक छोटेसे भाजी विक्रीचे दुकान आहे. लॉकडाऊनमुळे तेही बंद आहे. किशोर खासगी कंपनीत कंत्राटी पद्धतीवर कामाला होता. समाजकार्य संभाळून तो नोकरी करीत होता. मात्र जानेवारी महिन्यात त्याच्या आईची प्रकृती बिघडली. तिच्या शरीरातील रक्त कमी झाले. तिला जेवण जात नव्हते. किशोरने तिची कोरोना टेस्ट केली. मात्र टेस्ट निगेटिव्ह आली. किशोरला आईची काळजी घेणे आणि समाजकार्य करणे हा दोन महत्त्वाच्या गोष्टी वाटल्या. त्यामुळे त्याने नोकरी सोडली. त्याच्या माउलीनेही मुलाचे चांगले काम पाहून एक वेळचे जेऊ; पण घेतलेल्या चांगल्या कामाचा वसा टाकू नकोस, अशा शब्दांत प्रोत्साहन दिले.
चौकट-
१ मेपासून १८ वर्षापुढील सर्व वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. एकदा लस घेतल्यावर किमान ४५ दिवस रक्तदान करता येत नाही. त्यामुळे पुन्हा रक्ताचा तुटवडा भासू शकतो. लसीकरण आवश्यक आहे. ते केलेच पाहिजे. मात्र त्याआधी रक्तदान करा. त्यासाठी रक्तपेढ्यांनीही त्यासाठी २४ तास रक्तपेढी सुरू ठेवावी, असे आवाहन किशोर यांनी केले.
फोटो-
कल्याण-किशोर सातपुते
कल्याण-ऋषी साबळे
कल्याण-लढा रक्तदानाचा पोस्टर
--------------------
वाचली