शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

लॉकडाऊनकाळात फिटनेससाठी ठाणेकर वळले सायकलिंगकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 1:38 AM

संडे अँकर । वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय : फिटनेस, प्रशिक्षकांनी दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : लॉकडाऊनकाळात जिम आणि व्यायामशाळा बंद असल्याने फिटनेससाठी ठाणेकरांनी सायकलिंगवर भर दिला आहे. अनलॉकनंतर अद्याप जिम-व्यायामशाळा सुरू न झाल्याने आपले शरीर फिट ठेवण्यासाठी तसेच लॉकडाऊनमध्ये वाढलेले वजन नियंत्रणात आणण्यासाठी ठाणेकरांचा कल याकडे वाढला असून सर्वांगीण व्यायाम म्हणून त्यांनी सायकलिंगला पसंती दिल्याचे निरीक्षण फिटनेस प्रशिक्षकांनी नोंदविले.आजच्या जीवनशैलीत फिटनेसचे महत्त्व वाढले आहे. व्यस्त जीवनशैलीमुळे आजारांचे प्रमाणही वाढत आहे. या धावपळीच्या जगात प्रत्येकाला फिटनेस हवा आहे. त्यामुळे अनेक जण जिमकडे वळतात. लोकांची गरज लक्षात घेऊन अलीकडच्या काळात मोठ्या-मोठ्या जिमही उभ्या राहिल्या. कोरोनामुळे जिम-व्यायामशाळा बंद झाल्याने लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात अनेकांनी घरगुती व्यायामावर भर दिला. कोणी आॅनलाइन मार्गदर्शन तर कोणी यूट्युबवर व्हिडीओ पाहून व्यायाम करीत होते. पण त्यात सातत्य राखणे प्रत्येकाला शक्य नसते.महिलांचाही वाढला ओढामहिला वर्गाला तर वजनवाढीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सतावू लागला. त्यामुळे अनलॉक सुरू झाल्यानंतर हळूहळू बाहेर पडणे सुरू झाले तसे फिटनेसकडे ठाणेकर पुन्हा वळले. बंद झालेला व्यायाम पुन्हा सुरू करण्यासाठी सायकलिंगकडे सर्वोत्तम पर्याय म्हणून पाहू लागले. त्यामुळे हळूहळू सायकलिंगचे महत्त्व पटू लागल्याने लॉकडाऊनचा काळ सायकलिंगसाठी कारक ठरला आणि ठाणेकरांनी व्यायाम म्हणून त्याकडेच ओढा वाढविला.तरुण मंडळींचेही सायकलिंगला प्राधान्यफिटनेससाठी सायकलिंग निश्चितच उपयोगी आणि परिणामकारक आहे. उत्तम आरोग्यासाठी याचे अनेक फायदे आहेत. ३० ते ५० वयोगटांतील वर्गामध्ये सायकलिंगची आवड वाढली आहे.सायकलिंगमुळे हृदयाची, स्नायूंची क्षमता, रोगप्रतिकार क्षमता वाढते. २० वर्षांपूर्वी कामाला जाण्यासाठी सायकलचा भरपूर वापर होत असे तो अलीकडच्या काळात कमी झाला होता. पण लॉकडाऊनच्या काळात पुन्हा वाढल्याचे दिसून येते. येऊर, उपवन, घोडबंदर रोड या ठिकाणी सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत सायकलपटूंची संख्या अधिक दिसून येते. रस्त्यावर सायकल चालविण्याचा फायदा कितीतरी पटीने अधिक आहे. पँडलिंग करताना पायाची हालचाल अधिक होते. हृदय आणि मांडी यांच्यात अंतर जास्त आहे. जिथे स्नायूंची हालचाल जास्त होते तिथे हृदय रक्तपुरवठा करीत असते. चालण्यापेक्षा सायकलिंमध्ये जास्त फायदा आहे, वजनही लवकर कमी होते.- विनोद पोळ, जिम प्रशिक्षकसायकलमुळे कार्डिओ वर्कआउट होतो. सहनशक्ती, तग धरण्याची क्षमता वाढते. भूक लागते, वजन कमी होते. हृदय आणि फुप्फुसासाठी सायकलिंग केव्हाही चांगले. सायकलिंग करताना संतुलित आहारही महत्त्वाचा आहे.- मंदार आगवणकर, सचिव, मुंबई बॉडी बिल्डिंग असोसिएशनलॉकडाऊनच्या काळामध्ये बरेच ठाणेकर सायकलिंगकडे वळले आहेत. यामध्ये सर्वच वयोगटांतील ठाणेकरांचा समावेश दिसून येत आहे. विशेषत: सुटीच्या दिवसांत ठाणे आणि मुंबई परिसरात सकाळच्या वेळी अनेक रस्त्यांवर सायकलिस्टची संख्या अधिक आहे. याचाच परिणाम म्हणून अलीकडच्या काळात सायकलला प्रचंड मागणी वाढलेली दिसून येत आहे. विशेषत: हायब्रीड आणि रोड सायकलला मागणी वाढल्याने तुटवडा जाणवतो आहे. हायब्रीड सायकलसाठी तर जास्त वेटिंग करावे लागत आहे. मला एक निरीक्षण मुद्दाम नोंदवावेसे वाटते की दळणवळणाच्या साधनांच्या अभावामुळेसुद्धा अनेक जण सायकलकडे वळाले आहेत.- प्रा. नारायण बारसे,सायकलपटू

टॅग्स :Cyclingसायकलिंग