ठाणे - राज्यात एकाच वेळी शासनाने ई-चलन प्रणाली राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या प्रणालीचा शुभारंभ महिनाभरात होणार असल्याने वाहतूक नियमानुसार दंडवसुलीसाठी ठाण्यातही लवकरच ई-चलनाद्वारे दंडआकारणी होणार आहे. तसेच ई-चलनाबाबत वाहतूक पोलिसांना प्रशिक्षण दिले असून ३०० यंत्रेही दाखल झाल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.शहर पोलीस आयुक्तालयात ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांचा समावेश आहे. त्या शहरांमध्ये ठाणे वाहतूक शाखेच्या १८ उपशाखा आहेत. त्यामध्ये वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्यांकडून ई-चलन प्रणालीद्वारे दंडवसुली केली जाणार आहे. त्यासाठी ३०० ई-चलन यंत्रे ठाण्यात दाखल झाली असून ही यंत्रे हाताळणीचे प्रशिक्षण अधिकारी-कर्मचाºयांना देण्यात आले आहे. तसेच ही यंत्रे उपशाखेच्या कार्यक्षेत्रानुसार वाटप केली जाणार आहेत. कमी कार्यक्षेत्र असणाºयांना साधारणत: १०, १५ आणि जास्तीतजास्त २० यंत्रे एका उपशाखेला दिली जाणार असल्याची माहिती काळे यांनी दिली.काय आहे ही प्रणाली...वाहतूक नियम मोडणाºयांचा वाहन परवाना आणि वाहनांचे छायाचित्र ई-चलन यंत्रामध्ये चित्रित केले जाणार आहे. त्याआधारे यंत्रावर वाहन नोंदणीधारकाचे नाव, वाहन परवान्याच्या नोंदणीची इत्थंभूत माहिती तत्काळ उपलब्ध होते. तसेच कोणत्या प्रकारे वाहतूक नियम आणि त्याचे उल्लंघन केल्यावर भरावा लागणारा दंड याची यादी उपलब्ध असून त्याआधारे वाहतूक पोलीस संबंधितांवर रोख तसेच एटीएमकार्डाद्वारे दंडाची रक्कम वसूल करणार आहेत. दंड भरल्याची पावतीही दिली जाणार आहे.तो आॅनलाइन किंवा राज्यातील वाहतूक शाखेच्या कोणत्याही कार्यालयात जाऊन भरता येणार आहे. तसेच यामुळे वाहनचालकाने किती वेळेस नियम तोडले आणि यापूर्वी दंडाची रक्कम भरली आहे की नाही, याची माहिती यंत्रावर तत्काळ उपलब्ध होणार आहे. संबंधिताला एकूण दंड भरावा लागणार आहे. तसेच देण्यात येणाºया पावतीवर संबंधित क र्मचाºयांसाठी एक विशिष्ट कोडही दिला आहे. तसेच त्याने ती कारवाई कोणत्या ठिकाणी केली, याची नोंद होणार असल्याने त्या वाहतूक पोलिसांवर त्याद्वारे वॉच राहणार आहे.1562परवाने निलंबित करण्याचा प्रस्तावठाणे शहर वाहतूक शाखेने १ जानेवारी ते २८ डिसेंबर २०१८ या कालावधीत एक हजार ५६२ परवाने निलंबित करण्याचे प्रस्ताव तयार केले होते. त्यामधील ८६१ परवाने आरटीओ विभागाने, तर २०५ न्यायालयाने निलंबित केल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली.
ठाण्यात होणार ई-यंत्राने दंडवसुली, अमित काळे यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2019 4:07 AM