ठाणे - शाळेतील विद्यार्थ्यांना सकस आहार व स्वच्छतेचे महत्त्व कळावे व त्यांचे आरोग्य निरोगी रहावे, यासाठी ठाणे जिल्ह्यात आता ‘ईट राईट स्कूल’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व शाळांनी सहभागी होऊन शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांपर्यंत सकस आहाराचे महत्त्व पोचवावे, असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज केले.
राष्ट्रीय अन्न व मानके कायदा अंतर्गत समन्वय समितीची बैठक आज जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त तथा ईट राईट स्कूल उपक्रमाचे राज्याचे नोडल अधिकारी दिगंबर भोगावडे, अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त धनंजय काडगे, सहायक आयुक्त भू.दि. मोरे, जिल्हा अन्न व नागरी पुरवठाचे एस.एस. प्रधान, जिल्हा रुग्णालयातील आहार तज्ञ प्रिया गुरव, मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील रंजना सोनावणे, सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार पोवार, ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या संगीता बामणे, बालविकास अधिकारी अशोक बागूल, जे. एस. टोकेवार, व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी विजय ताम्हणे, ग्राहक प्रतिनिधी गजानन पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
‘भावी पिढी सुदृढ रहावी, त्यांना सकस व योग्य आहार मिळावा, यासाठी आतापासूनच जनजागृती करणे आवश्यक आहे. यासाठी ईट राईट स्कूल हा उपक्रम संवेदनशीलपणे राबविण्यात यावा.स्वच्छतेबद्दल मुलांमध्ये माहिती व्हावी, यासाठीही या उपक्रमात स्थान देण्यात आले आहे. या उपक्रमात प्रत्येक शाळेला वेगवेगळे गुणांकन असणार आहे. जास्तगुण मिळालेल्या शाळांचा गौरव होईल. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक शाळेतील शिक्षकांपर्यंत या उपक्रमाची माहिती पोहचवावी. विद्यार्थी व शिक्षकांना यामध्ये सक्रिय सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे मार्गदर्शनही नार्वेकर यांनी केले. या उपक्रमात शासकीय, निमशासकीय तसेच खासगी शाळांनाहीमुलांच्या निरोगी आरोग्यासाठी शाळांमध्ये आता ‘ईट राईट स्कूल’ उपक्रम - जिल्हाधिकारी