शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

पर्यावरणपुरक बसेसमधून आरामदाई प्रवासाची ठाणेकरांना हुलकावणी, ठेकेदारानेच गुंडाळला इथेनॉईल बसेसचा गाशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 3:04 PM

ठाणेकरांना पर्यावरण पुरक आरामदाई प्रवास देण्याच्या ठाणे परिवहन सेवेच्या इथेनॉईल बसेसला अखेर ब्रेक लागला आहे. ज्या ठेकेदाराकडून या बसेसेची अपेक्षा धरण्यात आली होती. त्यानेच आता गाशा गुंडाळल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली.

ठळक मुद्दे१०० बसेस होणार होत्या दाखलपालिका शोधणार नवा पर्याय

ठाणे - ठाणे महापालिकेने आता इलेक्ट्रीक बसपाठोपाठ इथेनॉईलवर चालणाऱ्या बसेस घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आपल्या मर्जीतील ठेकेदारालाच १०० इथेनॉईलवर चालणाºया बसेसचे कंत्राट देण्याचा घाट पालिकेतील काही मंडळीकडून सुरु होता. या संदर्भात लोकमतमध्ये वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर अखेर या ठेकेदारानेच या बसेसचा गाशा गुंडाळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता ठाणेकरांना या बसेसच्या बदल्यात दुसरा पर्याय काय द्यायचा याचा विचार आता सुरु झाला आहे.                   ठाणे महापालिकेच्या परिवहनच्या सेवेत जेएनएनयुआरएम अंतर्गत टप्याटप्याने २३० बसेस दाखल झाल्यात. शिवाय येत्या काळात १०० इलेक्ट्रीक बसेस दाखल होणार असून त्यातील पहिली बस काही दिवसांपूर्वीच परिवहनच्या ताफ्यात दाखल झाली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून पहिल्या महिन्याचा पालिकेचा हिस्सासुध्दा संबधींत ठेकेदाराने पालिकेला दिला आहे. पुढील वर्षी जुलैपर्यंत टप्याटप्याने उर्वरीत ९९ बसेस परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. या बसेससोबतच पालिकेने १०० इथेनॉईलवर धावणाºया बसेस घेण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला होता. या बसेस पर्यावरणाला साजेशा असून त्यामुळे प्रदुषण कमी होणार आहे. शिवाय इंधनाची बचत होणार आहे. प्रवाशांना देखील या बसेसमधून आरामधाई प्रवासाची हमी पालिकेने दिली होती. त्यानुसार पीपीपी तत्वावर या बसेस घेतल्या जाणार होत्या. पालिकेला या बसेसच्या उत्पन्नातून काहीही नफा मिळणार नाही. त्यामुळे पालिका या बसेसवर जाहीराती करुन त्या पोटी मिळणारे उत्पन्न आपल्या तिजोरीत टाकणार होते. त्यानुसार मागील दिवाळीपर्यंत ५० बसेस परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार होत्या. या बसेसचा रुटही घोडबंदर ते ठाणे आणि मुलुंड या मार्गावर धावणार होत्या.                     परंतु आता ज्या ठेकेदाराकडून या बसेस येणार होत्या. त्या ठेकेदारानेच आता यातून काढता पाय घेत गाशा गुंडाळल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली. अचानक ठेकेदाराने माघार का घेतली याचे उत्तर मात्र पालिका प्रशासनाकडून देण्यात आलेले नाही. परंतु या बसेसचे कंत्राट ठराविक किंवा आपल्या मर्जीतील ठेकेदाराला मिळावे म्हणून पालिकेतील काही अधिकाºयांनी फिल्डींग लावली होती. त्यानुसार निविदा काढण्यात आल्या होत्या. परंतु ज्या मर्जीतील ठेकेदाराला हे काम देण्याचा घाट घातला जात होता. त्याच्या विरोधात लोकमतमध्ये वृत्त प्रसिध्द झाल्याने त्याने यातून माघार घेतली होती. त्यामुळे पालिकेने पुन्हा फेरनिविदाही काढल्या होत्या. ज्या निविदाकाराने कंत्राट भरलेच नव्हते. त्यालाच हे काम देण्याचा घाटही घातला जात होता. त्यानंतर पुन्हा त्याच ठेकेदारासाठी नव्याने फिल्डींग लावली गेली होती.परंतु आता सर्व सोपास्कार झाल्यानंतर आता ठेकेदारानेच या बसेसबाबत अनास्था दाखविली असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली. शिवाय सुरवातीला जी काही रक्कम भरावी लागते, ती रक्कम सुध्दा अद्याप संबधींत ठेकेदाराने भरलेली नाही. त्यामुळे जवळ जवळ पर्यावरण पुरक बसेस पाहण्याचे स्वप्न मात्र आता भंगल्यात जमा आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त