शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

Raj Thackeray ED Notice : ... तर शांत बसणार नाही, अविनाश जाधव यांचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 10:53 AM

ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांना देखील नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

ठळक मुद्देठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांना देखील नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.'राज साहेबांसोबत अनुचित प्रकार घडला तर सरकारला परिणाम भोगावे लागतील.''सरकारने महाराष्ट्रात दडपशाही सुरू केली आहे.'

ठाणे - कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत मनसेप्रमुखराज ठाकरे हे आज सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीला सामोरे जात आहेत. या कारवाईमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबईत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कृष्णकुंज परिसर आणि दक्षिण मुंबईत ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे. तसेच ईडी कार्यालयाच्या परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करु नये, यासाठी मनसेच्या प्रमुख पदाधिकारी व मनसैनिकांना उपस्थित न राहण्यासाठी नोटीस बजाविल्या आहे. मनसे पदाधिकाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात आहेत. तसेच ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांना देखील नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

सरकारने महाराष्ट्रात दडपशाही सुरू केली आहे. राज साहेबांसोबत अनुचित प्रकार घडला तर सरकारला परिणाम भोगावे लागतील असं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे. मनसे वाहतूक सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष आशिष डोके, मनसे ठाणे शहर सचिव रवींद्र सोनार, मनसे प्रभागध्यक्ष विनायक रणपिसे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

दरम्यान, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे पूत्र व कोहिनूर समूहाचे संचालक उन्मेष जोशी तसेच त्यांचे तत्कालीन भागीदार राजन शिरोडकर यांच्या मागे लागलेला सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीचा ससेमिरा अद्याप संपलेला नाही. बुधवारी त्यांची पुन्हा आठ तास कसून विचारणा करण्यात आली असून, सोमवारी (दि. २६) त्यांना पुन्हा चौकशीसाठी कार्यालयात बोलावण्यात आले आहे.कोहिनूर स्क्वेअर टॉवर प्रकल्पाच्या प्रारंभापासून करण्यात आलेला व्यवहार आणि त्यासंबंधीच्या दस्तऐवजांबाबत या दोघांकडून सविस्तर माहिती घेतली जात आहे. त्यासाठी जोशी व शिरोडकर यांना एकत्र तसेच स्वतंत्र बसून विचारणा करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

दादर (प.) शिवसेना भवनासमोरील कोहिनूर मिल-३ या जागेत उभारल्या जाणाऱ्या कोहिनूर स्क्वेअर टॉवरच्या २१०० कोटींच्या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ईडीला संशय आहे. इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अ‍ॅण्ड फायनान्शियल सर्व्हिसेसद्वारे (आयएलएफएस) कंपनीच्या थकीत कर्जाच्या अनुषंगाने मनसेप्रमुख व कोहिनूर समूहाचे तत्कालीन भागीदार राज ठाकरे यांच्यासह जोशी व शिरोडकर यांची चौकशी सुरू केली.

चौकशीसाठी सोमवारी पुन्हा बोलावले

सोमवारी व मंगळवारी जोशी यांची सलग आठ तास चौकशी करण्यात आली होती तर शिरोडकर यांची मंगळवारी पाच तास चौकशी करण्यात आली. दोघांना बुधवारीही कार्यालयात बोलाविल्याने ते ११च्या सुमारास हजर झाले. कोहिनूर टॉवरच्या व्यवहरासंबंधीची कागदपत्रे त्यांनी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. दोघांची एकत्र तसेच स्वतंत्रपणे विचारणा करण्यात आली.

सुमारे सातच्या सुमारास ते कार्यालयातून बाहेर पडले. त्यांच्याकडील चौकशी अपूर्ण राहिल्याने त्यांना सोमवारी सकाळी ११ वाजता पुन्हा बोलाविण्यात आले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. या प्रकरणी जोशी यांनी आतापर्यंत जवळपास ३६ तास तर शिरोडकर यांनी १३ तास ईडीच्या कार्यालयात हजेरी लावली आहे.

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेMumbaiमुंबईMumbai policeमुंबई पोलीसEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय