शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या हाती वेळेत पडणार शैक्षणिक साहित्य

By admin | Published: May 04, 2017 5:52 AM

शासनाने काढलेल्या अध्यादेशानुसार ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने महापालिका शाळांतील तब्बल

ठाणे : शासनाने काढलेल्या अध्यादेशानुसार ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने महापालिका शाळांतील तब्बल ९५ टक्के विद्यार्थ्यांचे बँक अकाउंट ओपन केले असून उर्वरित ५ टक्के विद्यार्थ्यांचे आधारकार्ड नसल्याने त्यांचे अद्याप खाते सुरू करण्यात आले नाही. परंतु, या विद्यार्थ्यांचेदेखील आधारकार्ड काढून अकाउंट उघडल्यावर त्यांच्याही हाती प्रथमच शाळा सुरू झाल्यावर शैक्षणिक साहित्य पडणार असल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे. राज्य शासनाने ५ डिसेंबर २०१६ रोजी एक अध्यादेश काढला आहे. त्यानुसार, विविध कल्याणकारी योजनांमध्ये वस्तुरूपात मिळणाऱ्या लाभाचे हस्तांतरण रोख स्वरूपात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे लाभार्थ्यांना प्रत्येक योजनेचा पूर्णपणे लाभ होऊन अनावश्यक गोष्टी टाळता येऊ शकतील, असा यामागचा उद्देश आहे. यासंदर्भातील एक कार्यपद्धतीदेखील निश्चित केली असून यामध्ये वस्तूबाबत वितरण योजना तयार करणे, ती विकत घेण्यासाठी अनुदान ठरवणे, वितरित करण्यात येणाऱ्या वस्तूंचे परिमाण ठरवणे, या योजनांतर्गत पात्रतेचे निकष, पात्रतेप्रमाणे लाभार्थ्यांची निवड, लाभार्थ्यांची यादी तयार करून त्यांच्या आधार क्रमांकाशी जोडणी करणे, निवड केलेल्या पात्र लाभार्थ्यांच्या प्रकरणाला मान्यता देऊन त्यांना लेखी कळवणे, लाभार्थ्यांनी परिमाणाप्रमाणे वस्तूंची खरेदी करणे आणि संबंधित यंत्रणेने लाभार्थ्याने खरेदी केलेल्या वस्तूची व सादर केलेल्या पावतीची शहानिशा करूनच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करणे आदी महत्त्वाच्या कार्यपद्धती निश्चित केल्या आहेत. त्यानुसार, ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागानेदेखील या अध्यादेशाची अंमलबजावणी केली असून त्यानुसार आतापर्यंत ३२ हजार विद्यार्थ्यांपैकी ९५ टक्के विद्यार्थ्यांचे बँक अकाउंट ओपन करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाचे उपायुक्त मनीष जोशी यांनी लोकमतशी बोलताना दिली. त्यानुसार, आता विद्यार्थ्यांच्या बँक अकाउंटमध्ये गणवेश असो अथवा टॅब, वॉटरबॅग, पुस्तके आदींसह इतर साहित्यांची रक्कमही जमा होणार आहे. शिक्षण विभागाने निश्चित केलेल्या रकमेपेक्षा जास्तीची रक्कम जर विद्यार्थ्यांकडून दाखवली गेली, तर निश्चित केलेल्या वरची रक्कम त्याला मिळणार नाही, हे देखील शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. परंतु, उरलेल्या ५ टक्के विद्यार्थ्यांचे अकाउंट ओपन करण्यासाठी शिक्षण विभागाने शाळांना सुट्या लागण्यापूर्वीच त्यात्या शाळांच्या ठिकाणी आधारकार्ड कॅम्प लावून त्यांचे आधारकार्ड काढण्याची मोहीम पूर्ण केली आहे. त्यानुसार, त्यांचेदेखील अकाउंट ओपन करण्याची जबाबदारी त्यात्या विभागातील शिक्षकांकडे सोपवल्याची माहितीही शिक्षण विभागाने दिली. एकूणच शाळा सुरू होण्यापूर्वीच ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचा दावा करण्यात येऊन विद्यार्थ्यांच्या हाती आपसूकच वेळेत शैक्षणिक साहित्य पडेल, असा विश्वासही शिक्षण विभागाने व्यक्त केला. (प्रतिनिधी) ठाणे महापालिका क्षेत्रातील स्थितीमहापालिका शाळांची संख्या १३१विद्यार्थ्यांची संख्या ३२६३१मराठी माध्यम शाळा-८९ - विद्यार्थी १९ हजार ३१०हिंदी माध्यम शाळा-९ - विद्यार्थी २ हजार ८७१उर्दू माध्यम शाळा - २३ - विद्यार्थी ८ हजार ६१०गुजराती माध्यम शाळा -५ - विद्यार्थी २८५इंग्रजी माध्यम शाळा -५ - विद्यार्थी १५६४