शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार : एकनाथ शिंदे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 4:26 PM

धनगर प्रतिष्ठान या संस्थेने समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना धनगर रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

ठळक मुद्देविविध क्षेत्रातील मान्यवरांना धनगर रत्न पुरस्कारधनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार : एकनाथ शिंदे महिलांना खास लकी ड्रॉ द्वारे 5 पैठण्या

ठाणे : धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समवेत चर्चा करणार असून धनगर समाजाला आरक्षण कसे मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम ( उपक्रम ) मंत्री व ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त ठाण्यातील धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ या संघटनांच्या वतीने ठाण्यात गडकरी रंगायतन येथे आयोजित "धनगर रत्न" पुरस्कार सोहळ्यात केले                    धनगर समाज कित्येक वर्षांपासून धनगर आरक्षण लागू करावे म्हणून प्रयत्न करत आहे,यासाठी समाजाने अनेक आंदोलने केली आहेत परंतु धनगर आरक्षणाचा प्रश्न मात्र अद्याप सुटू शकलेला नाही यासाठी आपण पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या कडे याबाबत चर्चा करून आपला प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करून समाजाला आरक्षण कसे मिळेल यासाठी प्रयत्न करेल असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी उपस्थित समाज बांधवाना दिले,ठाण्यात धनगर समाज मोठ्या प्रमाणात असून समाजाच्या मागणी लक्षात घेता समाजाला हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी समाजभवन उपलब्ध करून देण्यासाठी मी समाजासोबत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले,धनगर प्रतिष्ठान या संस्थेने समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना धनगर रत्न पुरस्कार देऊन समाजातील रत्नाची माहिती समाजाला करून देऊन सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याने संस्थेचे एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम ( उपक्रम ) मंत्री व ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांना "धनगर रत्न" पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यामध्ये नाशिक- मालेगाव महापालिका आयुक्त संगीता धायगुडे ( साहित्य),मध्यप्रदेश तांत्रिक विभाग इलेक्ट्रिसिटी बोर्ड संचालक डॉ मुरहरी केळे ( शासकीय) शिवसेना ठाणे उपजिल्हाप्रमुख शंकर वीरकर (राजकीय),पोलीस उपनिरीक्षक दिलीप गढरी, (क्रीडा),शिवराम पाबळे (उद्योजक),माणगंगा प्रतिष्ठान,ठाणे ( सामाजिक संस्था),ठाणे जिल्हा बँकेचे माजी संचालक बाबासाहेब दगडे ( शैक्षणिक),सरपंच शंकर खेमणार ( सामाजिक),पिवळं वादळ मासिक संपादक विजय तमनर ( पत्रकारिता),आदी मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाला महात्मा फुले जन आरोग्य योजना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुधाकर शिंदे,नाशिक- मालेगाव महापालिका आयुक्त संगीता धायगुडे, शिवसेना ठाणे उपजिल्हाप्रमुख शंकर वीरकर,यशवंत सेना सरसेनापती माधवभाऊ गडदे,धनगर समाजाचे नेते जयसिंग तात्या शेंडगे,उपवनसंरक्षक दादासाहेब शेंडगे,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे,धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष केदार दिघे,समाजसेविका भारती चौगुले, धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे,धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या अध्यक्षा माधवी बारगीर,डॉ अरुण गावडे,ज्ञानेश्वर परदेशी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते .यावेळी महिलांना खास लकी ड्रॉ द्वारे 5 पैठण्या तसेच पुरुषांसाठी खास आकर्षक बक्षिसे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष महेश गुंड,सचिव संदेश कवितके, खजिनदार कुमार पळसे,उपाध्यक्ष संतोष बुधे,प्रचारप्रमुख अविनाश लबडे,उपसचिव अमोल होळकर,उपखजिनदार तुषार धायगुडे,सल्लागार सुनील राहिंज,सूर्यकांत रायकर,दिलीप कवितके,मनोहर वीरकर,कार्यकारणी सदस्य गणेश बारगीर,राजेश वीरकर,सुरेश भांड,अरुण परदेशी ,दीपक झाडे,सचिन बुधे,मंगेश गुंड,ऋषी पिसे,महेश पळसे,प्रशांत कुरकुंडे, धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ अध्यक्ष माधवी बारगीर,उपाध्यक्ष सुजाता बुधे, सचिव गायत्री गुंड,खजिनदार भारती पिसे,उपसचिव अश्विनी पळसे,उपखजिनदार संगीत खटावकर,सल्लागार अर्चना वारे,सदस्य सुचिता कुचेकर,सुषमा बुधे,सीमा कुरकुंडे,स्नेहा खटावकर,रतन वीरकर,सुजाता भांड आदीनी परिश्रम घेतले.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक