शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

१७ डिसेंबरला रत्नाकर मतकरी स्मृती मालेत ईद - दीपावली - नाताळ संमेलन, सलोखा विषयावर विविध कार्यक्रम  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 2:51 PM

Ratnakar Matkari Smriti Mala : येत्या गुरुवारी, १७ डिसेंबरला सायं. ६:३० वा. ठाण्यात समता विचार प्रसारक संस्था पुरस्कृत वंचितांचा रंगमंचाच्या वतीने, ईद - दीपावली - नाताळ स्नेह संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

ठाणे  - येत्या गुरुवारी, १७ डिसेंबरला सायं. ६:३० वा. ठाण्यात समता विचार प्रसारक संस्था पुरस्कृत वंचितांचा रंगमंचाच्या वतीने, ईद - दीपावली - नाताळ स्नेह संमेलन आयोजित करण्यात आले आहे. रत्नाकर मतकरी स्मृती मालेतील हा सहावा मासिक कार्यक्रम आहे, अशी माहिती कार्यक्रमाच्या संयोजक व संस्थेच्या सचिव हर्षलता कदम यांनी  कळवली आहे.

भारतीय संविधानाने सर्व जाती धर्मियांना देशात समतेची वागणूक मिळेल, अशी हमी दिली आहे. तरीही देशात बुरसटलेल्या सनातनी प्रवृत्तींमार्फत भिन्न जाती – धर्मीयात तेढ निर्माण करण्याचे कारस्थान अनेकदा रचले जाते व त्यात सर्वसामान्य गोरगरीब जनता भरडली जाते. जन सामान्यांत सर्व धर्मीय समभाव बळकट व्हावा, यासाठी समता विचार प्रसारक संस्था गेली अनेक वर्षे ईद - दीपावली संमेलनाचा उपक्रम राबवीत आहे. यंदा या कार्यक्रमात सलोखा अर्थात सर्वांमध्ये मैत्री या थीमवर विविध लोकवस्तीं मधील एकलव्य कलाकार व कार्यकर्ते विविध कला कार्यक्रम सादर करणार आहेत. बाळकुम - माजीवडा येथील मुले सलोखा विषयावर तर कळवा - सावरकर नगरचे सर्व धर्म समभाव यावर  नाटिका सादर करणार आहेत. मानपाडा व लोकमान्य नगरचे कलाकार मैत्रीवर अभिवाचन करणार आहेत तर कोपरीचे कलाकार गाणे सादर करणार आहेत. तसेच पंडित जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधी या वडील - लेकीतील मैत्रभावनेवर एक एकपात्री प्रयोग सादर होणार आहे. याशिवाय इस्लाम व ख्रिश्चन धर्मावर त्या त्या धर्माचे अभ्यासक मांडणी करणार आहेत. प्रसिद्ध रंगकर्मी मंगेश देसाई हे रत्नाकर मतकरी यांच्या भाऊ या धार्मिक सलोख्यावरील कथेच्या वाचनाने या रंगतदार कार्यक्रमाचा समारोप करणार आहेत.

टॅग्स :thaneठाणेmarathiमराठी