ठाणे : कोरोनाच्या चक्रव्यूहातून आजपर्यंत जिल्ह्यात तीन लाख ५४ हजार लोक मुक्त झाले आहेत. यामध्ये शहरी भागात तीन लाख २२ हजार (८६ टक्के) असून, उर्वरित ग्रामीणमध्ये आहेत. सध्याचा कोरोना कहर पाहता जिल्ह्यातील रुग्णालयांतील खाटा कमी पडू लागल्या आहेत. त्यात ऑक्सिजन मिळत नसल्याच्या चर्चा, व्हेंटिलेटरची कमतरता जिल्ह्यातील सध्या चर्चेचा विषय आहे. त्यात औषधांचा काळाबाजार, रेमडेसिविरची वाढती मागणी पूर्ण करण्यात असलेले अपयश, भीतीमुळे लसीकरण केंद्रांवर लागलेल्या रांगा अंगावर शहारे आणणाऱ्या पाहायला मिळत आहे. त्यातच सध्या ठाणे, नवी मुंबई, केडीएमसी, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भाईंदर या सहा महापालिका क्षेत्रात तब्बल तीन लाख २० हजार रुग्ण घरच्या घरी क्वॉरंटाइन झाले आहेत. अंबरनाथ, बदलापूरला दोन लाख ४३ हजार ९४, ग्रामीणमध्ये दोन लाख ९१ हजार ३३५ आदी मिळून जिल्ह्यात आठ लाख ५४ हजार ४०२ जण घरातच क्वाॅरंटाइन होऊन कोरोनामुक्तच्या नियमांचे पालन करीत आहेत.
जिल्ह्यात साडेआठ लाख नागरिक हाेमक्वाॅरंटाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 4:42 AM