ठाणे : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ४२९ने वाढली असून आठ जणांचा शनिवारी मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत पाच लाख ३७ हजार ३५८ रुग्णांची व दहा हजार ८३६ मृतांची नोंद झाली आहे.
या रुग्णसंख्येत ठाणे शहरातील ९६ रुग्ण असून शनिवारी दिवसभरात दोन जणांचा मृत्यू झाला. यासह बाधितांची संख्या एक लाख ३४ हजार ३३५, तर मृतांची संख्या दोन हजार ३६ नोंदली गेली आहे. कल्याण-डोंबिवलीत ११४ बाधित सापडले असून दोन मृत्यू झाले आहेत. या शहरात एक लाख ३७ हजार ४४७ बाधितांसह दोन हजार ६२८ मृतांची नोंद झाली.
उल्हासनगरमध्ये चार बाधित सापडले असून मृत्यू नाही. यासह शहरात २० हजार ८७१ बाधितांना ५२२ मृतांची नोंद केली आहे. भिवंडीत तीन बाधित आढळले असून एकही मृत्यू नाही. यामुळे या शहरात दहा हजार ६५४ बाधितांसह ४६० मृत्यूंची नोंद आहे. मीरा-भाईंदरला ३८ बाधित असून एकही मृत्यू नाही. या शहरातील ५१ हजार ३७ बाधित व एक हजार ३४२ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अंबरनाथमध्ये १४ बाधित आढळले असून एकही मृत्यू नाही. यामुळे येथील बाधितांची संख्या १९ हजार ८९३ तर मृतांची संख्या ५१८ नोंदली गेली आहे. कुळगांव-बदलापुरात १६ बाधित सापडले असून एक मृत्यू आहे. येथील बाधित २१ हजार ३१० तर मृत्यू ३४९ नोंदली आहे. ग्रामीणमध्ये ४४ बाधित सापडले तर एक मृत्यू आहे. यामुळे या ग्रामीण क्षेत्रात आतापर्यंत ३९ हजार ८५४ बाधितांसह एक हजार १९५ मृतांची नोंद झाली आहे.