शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

भिवंडीत गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा आठ लाखांचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 12:03 AM

ठाण्याचे अन्न व औषध प्रशासन विभाग आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी युनिटने संयुक्तरित्या भिवंडीतील अवचितपाडा येथे केलेल्या कारवाईमध्ये आठ लाख २८ हजार ५५० रुपयांचा गुटखा गुरुवारी जप्त केला. गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा करुन त्याची तस्करी करणाºया मोहम्मद शेख याला या पथकाने अटक केली आहे.

ठळक मुद्देतस्करी करणाऱ्यास अटकभिवंडी गुन्हे शाखेची कारवाईअन्न व औषध प्रशासन विभागाचाही कारवाईमध्ये संयुक्त सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोनाचा प्रादूर्भाव रोखरण्यासाठी राज्यभरात संचारबंदी असूनही प्रतिबंधित केलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा करुन त्याची तस्करी करणाºया मोहम्मद इश्तीयाक शेख (३९, रा. भिवंडी, ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी युनिटने गुरुवारी अटक केली. त्याच्याकडून आठ लाख २८ हजार ५५० रुपयांचा विविध कंपन्यांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भिवंडी शहरात लॉकडाऊनची स्थिती असतांनाही एक व्यक्ती प्रतिबंधित केलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या साठयाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे ठाणे येथील अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी लोहकरे आणि त्यांच्या पथकाच्या मदतीने पोलीस निरीक्षक अशोक होनमाने, सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र जाधव, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण जोरी, जमादार सुभाष अहिरे, अब्दुल मन्सुरी आणि रविंद्र पाटील आदींच्या पथकाने भिवंडीतील अवचितपाडा येथे ९ एप्रिल रोजी छापा टाकला. याच छाप्यामध्ये मोहम्मद शेख याच्याकडे विविध नामांकित कंपन्यांचा विक्रीसाठी साठा केलेला आठ लाख २८ हजारांचा गुटखा हस्तगत करण्यात आला. हा गुटखा पकडल्यानंतर मेसर्स नाझ एंटरप्रायझेसच्या नावाने नमराह रेसीडेन्सीमध्ये चालणारा गाळा क्रमांक दोन हा पोलिसांनी सील केला आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६, नियम व नियमने २०११ च्या कलमांनुसार तसेच भारतीय दंड विधानाच्या कलम ३२८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र जाधव याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेArrestअटकTobacco Banतंबाखू बंदी