ठाणे: काश्मीर येथून वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये निघालेला १७ टनांचा सफरचंदाचा ट्रक उलटल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ठाण्यात घडली असतानाच दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वसई येथून वाशीच्या मार्केटला निघालेला आठ टन काजूचा ट्रक घोडबंदर रोडवरील गायमुख येथे उलटला. सुदैवाने यामध्येही कोणी जखमी झालेले नसल्याची माहिती सूत्रंनी दिली. हा ट्रक रस्त्याच्या बाजूला करण्याचे काम ठाणो महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने हाती घेतले.
विजयकुमार यादव यांच्या मालकीचा ट्रक प्रदीप कुमार हा चालक वसई येथून वाशीकडे दुपारच्या सुमारास ठाणो मार्गे जात होता. त्यामध्ये आठ टन काजू होते. हा ट्रक घोडबंदर रस्त्यावर (ठाणे मार्गाने) खाली गायमुख जकात नाक्याजवळ समोर टीएमसी शाळा क्रमांक ९७ येथे आल्यावर अचानक उलटला. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभागासह कासारवडवली पोलिसांसह वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच ट्रकमधील काजूही दुस:या वाहनांमध्ये भरून तो ट्रक खाली करण्यात आला. त्यानंतर तातडीने हायड्रा क्र ेन बोलावून उलटलेला ट्रक रस्त्याच्या एका बाजूला करण्यात आल्याची माहिती सूत्रंनी दिली.