शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
2
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
3
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
4
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
5
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
6
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
7
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
8
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
9
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
10
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
11
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
12
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
13
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
14
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
15
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
16
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
17
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
18
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
19
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
20
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा

एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब (अ) दुसऱ्या फेरीत श्रीकांत शिंदेंनी केली फटकेबाजी

By प्रज्ञा म्हात्रे | Published: May 02, 2023 3:17 PM

दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृहात आज झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकल्यावर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्पोर्टसमन क्रिकेट क्लबने घेतला.

ठाणे : एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब  (अ ) संघाने  स्पोर्ट्समन क्रिकेट क्लबचा १२२ धावांनी धुव्वा उडवत महाराष्ट माझा सेवा संस्था आयोजित ठाणे प्रिमियर लीग - मुख्यमंत्री चषक टी - २० लीग क्रिकेट स्पर्धेत विजयी शुभारंभ केला. विजयासाठी १९१ धावांचा पाठलाग करणाऱ्या स्पोर्टसमन क्रिकेट क्लबला अवघ्या ६८ धावांत गुंडाळत एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब (अ) संघाने आगेकूच केली. सामना सुरू होण्याआधी खा. श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित लावत फटकेबाजी केली. 

दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृहात आज झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकल्यावर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्पोर्टसमन क्रिकेट क्लबने घेतला. ढगाळ वातावरणात एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब (अ) संघाच्या फलंदाजांनी प्रतिस्पर्धी गोलंदाजांना वरचढ होऊ न देता २० षटकात ९ बाद १९१ धावांचे आव्हान उभे केले. अखिल हेरवाडकरने ७१ आणि शशिकांत कदमने ३९ धावांचे योगदान दिले.  निपुण पांचाळने नाबाद १७ धावांची खेळी केली. अकीब शेखने ३ तर जय चौगुलेने २ विकेट्स मिळवल्या. उत्तरादाखल स्पोर्टसमन क्रिकेट क्लबचा डाव १८.१ षटकात अवघ्या ६८ धावांत आटोपला. त्यांच्या संकेत यशवंते (१२) आणि अकिब शेखचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी धावा करता आल्या नाहीत. विजेत्यांच्या विद्याधर कामतने ३, मोहित अवस्थी आणि यश चौहानने प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या. 

संक्षिप्त धावफलक :  एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब (अ) संघ : २० षटकात ९ बाद १९१ ( अखिल हेरवाडकर ७१, शशिकांत कदम ३९, निपुण पांचाळ नाबाद १७, अकिब शेख ४-३२-३, जय चौगुले ४-४०-२) विजयी विरुद्ध स्पोर्ट्समन क्रिकेट क्लब : १८.१ षटकात सर्वबाद ६८ ( संकेत यशवंते १२, अकिब शेख १०, विद्याधर कामत ४-११-३, मोहित अवस्थी २-७-२, यश चौहान ४-१-१९-२).

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShrikant Shindeश्रीकांत शिंदे