शहरं
Join us  
Trending Stories
1
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
2
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
3
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
4
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
5
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
6
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
7
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
8
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
9
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
10
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
11
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
12
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
13
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
14
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
15
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
16
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
17
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
18
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
19
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
20
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात

उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?

By सदानंद नाईक | Published: September 28, 2024 6:33 PM

गेली ३५ वर्ष पप्पू कलानी व कुमार आयलानी हे आलटून पालटून आमदार पदी राहिले आहेत

सदानंद नाईक, उल्हासनगर: कलानी व आयलानी यांना आवाहन देत शिंदेंसेनेचे माजी महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दंड थोपटले. कलानी व आयलानी यांनी गेल्या ३० ते ३५ वर्षात केलेला विकास दाखवा, असे आवाहन शहरवासीयांना चौधरी यांनी केले.

उल्हासनगरचे सलग २० वर्ष आमदार राहिलेल्या पप्पु कलानी यांचा २००९ साली भाजपचे कुमार आयलानी यांनी पराभव करीत सर्वांना धक्का दिला. तर ज्योती कलानी यांनी सन-२०१४ साली कुमार आयलानी यांचा मोदी लाटेत पराभव करून विजय मिळविला. तर सन-२०१९ साली कुमार आयलानी पुन्हा आमदार पदी निवडून आले. त्यांनी ज्योती कलानी यांच्यावर निसटता विजय मिळविला. म्हणजे गेली ३५ वर्ष कलानी व आयलानी हे आलटून पालटून आमदार पदी राहिले. पुन्हा आयलानी व कलानी यांच्या लढतीकडे पाहिले जाते. मात्र यावेळी आयलानी यांच्यापुढे स्वपक्षातील प्रदीप रामचंदानी, महेश सुखरामानी, जमनुदास पुरस्वानी यांनी आवाहन उभे केले. तर मित्र पक्ष असलेल्या शिंदेंसेनेचे माजी महानगरप्रमुख व मराठी चेहरा असलेले राजेंद्र चौधरी यांनीही दंड थोपटले.

 महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून ओमी कलानी यांनी निवडणूक वाढविण्याचे जाहीर केले. दरम्यान रिपाइं आठवले गटतून हकालपट्टी झालेल्या भगवान भालेराव यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन राष्ट्रवादी पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मीच असेल, असे संकेत दिले. नेहमी प्रमाणे आयलानी व कलानी भोवती फिरणारी निवडणूक यावेळी राजेंद्र चौधरी व इतर चेहऱ्या भोवती फिरत आहेत. गेल्या ३५ वर्षात आयलानी व कलानी यांनी शहराचा विकास केला नसल्याने, शहरातून सिंधी समाजासह इतर समाज पलायन करीत असल्याची माहिती दिली. शहराला वेगळी ओळख देण्यासाठी शहरवासीयांनी यावेळी वेगळ्या चेहऱ्याचा विचार करावा. असे चौधरी म्हणाले. राज्यात महायुतीचे सरकार येण्यासाठी व उल्हासनगरातून आयलानी ऐवजी शिंदेंसेनेला तिकीट मिळायला हवे. पक्षाकडे तिकीट मागितले असून पक्षाने विश्वास दाखविल्यास ते सार्थ ठरविणार असल्याचे चौधरी यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाulhasnagarउल्हासनगरEknath Shindeएकनाथ शिंदे