शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

एकनाथ शिंदे खेळणार ठाण्यात आनंद दिघे कार्ड, बाळासाहेब व आनंद दिघे यांना अभिप्रेत हिंदुत्वाचे पाऊल उचलणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 11:16 AM

Eknath Shinde: यापूर्वी बंड केलेल्या नेत्यांचा पूर्वानुभव लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शिवसेनाप्रमुख आनंद दिघे यांचे कार्ड खेळण्याचे ठरवलेले दिसत आहे. दिघे यांचा शिंदे यांच्याशी जोडलेला वारसा ठाकरे हेही आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाहीत, हे लक्षात घेऊन शिंदे यांनी धूर्त खेळी केली.

- संदीप प्रधान ठाणे : शिवसेनेत बंड करणाऱ्या राज ठाकरे यांनाही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपले छायाचित्र व नाव वापरण्यास मज्जाव केला होता. नारायण राणे यांनाही बाळासाहेबांनी लक्ष्य केले होते. यापूर्वी बंड केलेल्या नेत्यांचा पूर्वानुभव लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शिवसेनाप्रमुख आनंद दिघे यांचे कार्ड खेळण्याचे ठरवलेले दिसत आहे. दिघे यांचा शिंदे यांच्याशी जोडलेला वारसा ठाकरे हेही आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाहीत, हे लक्षात घेऊन शिंदे यांनी धूर्त खेळी केली.

शिंदे हे समर्थक आमदारांसोबत सुरत या भाजपच्या गडात जाऊन बसले आहेत. त्यामुळे त्यांनी बंडाच्या दिशेने पाऊल टाकले आहे. आपल्या व समर्थक आमदारांच्या मागण्या मान्य करवून घेण्याकरिता शिंदे हे राज्यात भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांच्यासमोर ठेवून ते भाजपवर दबाव टाकत असल्याचे ठाण्यातील त्यांच्या समर्थकांमध्ये बोलले जात आहे. शिंदे हे शिवसेनेत अस्वस्थ होते. ठाणे महापालिकेत स्वबळावर शिवसेनेला कधीही सत्ता मिळाली नव्हती. ती शिंदे यांनी मागील वेळी मिळवून दिली. कल्याण-डोंबिवली व अन्य महापालिकांमध्येही त्यांनी सेनेची सत्ता स्थापन केली. लोकांमध्ये पाळेमुळे रुजलेली असतानाही व स्वपक्षीय आमदारांशी दांडगा संपर्क असतानाही अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांना डावलले जात असल्याची त्यांना खंत वाटत होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातूनही शिंदे यांना शह देण्याचा प्रयत्न मातोश्रीकडून झाल्याची चर्चा आहे. त्यामुळेही ते अस्वस्थ होते.

ठाणे शहरातील महापालिका व विधानसभा निवडणुकीत राज्यातील महाविकास आघाडी सरकारामुळे पुन्हा यश मिळण्यात अडचण येऊ शकते, असे त्यांना जाणवले होते. शिवसेनेने हिंदुत्व सोडल्यामुळे ठाणे, डोंबिवली, कल्याण परिसरातील उच्चभ्रू, मध्यमवर्गीय मतदार शिवसेनेला जवळ करेल किंवा कसे याबद्दल ते साशंक असल्याने त्यांनी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर उचल खात बंड केले. भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याच्या भूमिकेची पाठराखण करणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांचा गट आपल्या मागे उभा केला. बाळासाहेब व आनंद दिघे यांना अभिप्रेत हिंदुत्वाकरिता आपण हे पाऊल उचलल्याचे त्यांनी जाहीर केले. बाळासाहेब यांचा वारसा थेट ठाकरे यांच्याशी जोडलेला असला तरी आनंद दिघे यांचा वारसा आपल्याशी जोडलेला असल्याने त्यांनी दिघे यांचेही नाव खुबीने वापरले आहे.

धर्मवीर या चित्रपटाची निर्मिती करून व दिघे यांच्या यशोगाथेचा कार्यक्रम टीव्हीवरून घराघरात पोहोचला असताना आपल्या राजकीय बंडात आनंद दिघे यांचे नाव वापरणे ही शिंदे यांनी विचारपूर्वक केलेली खेळी असल्याचे त्यांच्या समर्थकांचे मत आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेनाthaneठाणे