ठाणे : जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळेच रुग्णसंख्या वाढीचा वेग आता मंदावल्याचे निदर्शनास येत आहे. मंगळवारीही कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये बऱ्याच अंशी घट झाली. तरीही गेल्या 24 तासांमध्ये एक हजार 503 नविन बाधितांची तर 35 जणांच्या मृत्यूची नोंद जिल्हाभर झाली. त्यामुळे बाधितांची संख्या 58 हजार 507 तर मृतांची संख्या एक हजार 689 इतकी झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. विशेष म्हणजे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वीय सहायकालाही कोरोनाची लागण झाली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रमध्ये 344 नविन रुग्णांची तर नऊ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे ठाण्यात बाधितांची संख्या 14 हजार 19 तर मृतांची संख्या 524 वर गेली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रमध्ये 335 रुग्णांसह नऊ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे बाधितांची संख्या 13 हजार 576 तर मृतांची 207 इतकी झाली आहे. नवी मुंबई महापालिकेत 239 रुग्ण नव्याने दाखल झाले असून पाच जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे बाधितांचा आकडा नऊ हजार 917 तर मृतांची संख्या 310 वर पोहचली आहे. मीरा-भाईंदरमध्ये 105 रु ग्णांसह आठ जणांच्या मृत्यूमुळे बाधितांची संख्या पाच हजार 851 तर मृतांची 207 वर पोहचली आहे. भिवंडी महापालिकेच्या क्षेत्रतही नवे 26 रुग्ण दाखल झाले. याठिकाणी एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे बाधितांची संख्या दोन हजार 850 तर मृतांची 148 वर पोहोचली. उल्हासनगरमध्ये 193 रुग्णांची नोंद झाली. याठिकाणी आतार्पयतच्या बाधितांची संख्या चार हजार 619 झाली आहे. तर अंबरनाथमध्ये 49 रुग्ण नव्याने दाखल झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाधितांची संख्या दोन हजार 774 तर मृतांची 108 झाली. त्याचबरोबर बदलापूरमध्ये 47 नव्या रुग्णांची नोंद झाली. याठिकाणी बाधितांची संख्या आता एक हजार 524 झाली आहे. ठाणो ग्रामीण भागात 164 रु ग्णांची तर दोघांच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या तीन हजार 378 तर मृतांची 93 वर गेल्याची माहिती सूत्रंनी दिली.
पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यकही बाधित
राज्याचे नगरविकासमंत्री तथा ठाणो जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यकालाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा चाचणी अहवाल पाझिटीव्ह आल्यामुळे त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केल्याची माहिती सूत्रंनी दिली.