लोकमत न्यूज नेटवर्कठाणो: वेब सिरिजद्वारे लष्कराची बदनामी करणा-या एकता कपूर या निर्मातीविरु द्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी ठाण्यातील निवृत्त सैनिक डी. एन. साबळे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्याकडे केली आहे. सैनिकांच्या पत्नींबद्दल तसेच सैनिकांच्या वर्दीची यात अवहेलना केल्याने ही सिरिज बंद करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.साबळे यांनी गुरु वारी अंबुरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कपूर यांनी सुरु केलेल्या वेबसिरिजद्वारे भारतीय लष्कराच्या सैनिकांच्या पत्नींबद्दल विचित्र चित्रीकरण केले आहे. यामध्ये सैनिक कर्तव्य बजावण्यासाठी गेल्यानंतर त्याची पत्नी तिच्या मित्राला पतीची वर्दी परिधान करण्यास देते. त्यानंतर ती त्याला मारहाण करते. यात वर्दीचा आणि सैनिकांचाही अपमान असून सैनिक पत्नींच्याही चारित्र्यावर शिंतोडे उडविले जात आहेत. निर्माती एकता कपूर यांनी भारतीय सैनिकांचा अशा प्रकारे अपमान करण्यापेक्षा पाकिस्तान किंवा इतर देशातील लष्करातील कथानकांवर आधारित वेबसिरिजची निर्मिती करावी. परंतू, भारतीय सैनिक आणि यांच्या पत्नींबद्दल असे अपमानजनक चित्रण कदापि सहन केले जाणार नाही. यात सैनिकाची पत्नी, तिच्या आपल्या मित्राला पतीची वर्दी दिल्यानंतर ती फाडतानाचे चित्रण आहे. या वर्दीसाठी सैनिकांना प्रचंड मेहनत घ्यावी लागते. अशा चित्रणामुळे सैन्य दलात येण्यासाठी तरु ण मुले धजावणार नाहीत. शिवाय, यातून सैन्याचाही अपमान होत आहे. त्यामुळे ही वेबसिरिज बंद करावी. कपूर यांनी त्याबद्दल माफी मागावी. त्यांच्याविरु द्ध याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या पत्राद्वारे साबळे यांच्यासह ठाण्यातील निवृत्त सैनिकांनी केली आहे.
‘वेब सिरिजद्वारे लष्कराची बदनामी करणाऱ्या एकता कपूरविरु द्ध गुन्हा दाखल करावा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 10:40 PM
सैनिकांच्या पत्नींबद्दल तसेच सैनिकांच्या वर्दीची वेबसिरिजद्वारे अवहेलना करणाºया निर्माती एकता कपूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच ही वादग्रस्त वेबसिरिज तातडीने बंद करण्यात यावी, अशी मागणी लष्कारातून निवृत्त झालेल्या डी. एन. साबळे यांच्यासह संतप्त सैनिकांनी गुरुवारी वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
ठळक मुद्देनिवृत्त सैनिकांचा ठाण्यात संतापवागळे इस्टेट परिमंडळाच्या पोलीस उपायुक्तांना दिले पत्रवेबिसरजिचे प्रसारण बंद करण्याची मागणी