शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

भाईंदरमध्ये निवडणूक, सुट्यांमध्ये बेकायदा ‘इमले’; भूमाफियांची दिवाळी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 10:59 PM

खाजगी आणि सरकारी जागेतही फुटले पेव, पालिका प्रशासनाकडून अद्याप कारवाई शून्य

मीरा रोड : विधानसभा निवडणूक आणि लागोपाठ आलेल्या सुट्यांचा फायदा घेत खाजगी आणि सरकारी जागेत बेकायदा बांधकामे करणाऱ्यांची दिवाळी सुरू आहे. दैनंदिन कामकाज सांभाळून निवडणुकीचे काम करायचे असताना महापालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांपासून अतिक्रमण विभाग आणि वरिष्ठ अधिकाºयांनी शहरात राजरोस चालणाºया बेकायदा बांधकामांकडे डोळेझाक चालवली आहे. तसेच सरकारी जमिनींवरील अतिक्रमणांकडेही महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने साटेलोटे असल्याची चर्चा जोर धरत आहे. लोकसभा निवडणूक काळात झालेली बहुतांश बेकायदा बांधकामे पालिकेने अद्याप तोडलेली नाहीत.

विधानसभा निवडणुकीच्या कामानिमित्त महापालिका आणि महसूलचे अधिकारी-कर्मचाºयांचे दैनंदिन कामांकडे दुर्लक्ष होते. निवडणुकीचे काम असल्याचे सांगून अधिकारी - कर्मचारी कार्यालयांमध्ये सापडत नाहीत, पण बेकायदा बांधकामांच्या तक्रारींवरही दुर्लक्ष करतात. महापालिकेच्या अधिकाºयांसह या बेकायदा बांधकामांविरोधात लोकप्रतिनिधीही मूग गिळून बसतात.

बेकायदा बांधकामांमध्ये बक्कळ काळा पैसा मिळत असल्याने अनेकांचे खिसे यात भरले जातात. गाळा वा खोली लाखो रुपयांना विकली जाते. बेकायदा बांधकामांप्रकरणी याआधीही नगरसेवक, अधिकारी लाच घेताना रंगेहाथ पकडले गेले आहेत. यावरून यात मोठा भ्रष्टाचार चालत असल्याचे उघड आहे.

विधानसभा निवडणूक आणि त्याला लागूनच आलेल्या दिवाळीच्या सुट्या यामुळे बेकायदा बांधकाम करणाºयांना मोकळे रान मिळाले आहे. त्यामुळे शहरात नव्याने तसेच वाढीव बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट चालला आहे. महापालिकेची प्रभाग समिती क्र. १ भार्इंदर - मुर्धा ते उत्तन; प्रभाग समिती क्र. २ जय अंबेनगर ते बजरंगनगर, गणेश देवलनगर, शास्त्री - नेहरूनगर; प्रभाग समिती क्र. ३ भार्इंदर पूर्व परिसर, प्रभाग समिती क्र. ४ भार्इंदर पूर्व ते घोडबंदर आणि प्रभाग समिती क्र. ६ पेणकरपाडा ते काजूपाडा आदी परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामांचे पेव फुटले आहे.

यातील प्रभाग समिती क्र. ६ व १ तर बेकायदा बांधकामांसाठी कुख्यात असून या दोन्ही ठिकाणी लाच घेताना रंगेहाथ पकडले गेलेल्या चंद्रकांत बोरसे व सुनील यादव या अधिकाºयांनाच आयुक्त बालाजी खतगावकर यांनी प्रभाग अधिकारी म्हणून नेमल्याने याचे लागेबांधे चर्चेचा विषय ठरला आहे. खाजगी आणि सरकारी जमिनींसह कांदळवन, सीआरझेड, ना-विकास क्षेत्र आदी ठिकाणी सर्रास भराव करून बेकायदा बांधकामे केली जात आहेत.

लोकसभा निवडणुकीवेळीही मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे झाली होती. ती पालिकेने तोडली नसून प्रसिद्धिमाध्यमांनी टीकेची झोड उठवल्यानंतर जी कारवाई करण्यात आली. त्यातील बहुतांश बांधकामे परत झालेली आहेत, असा नागरिकांचा आरोप आहे. भ्रष्टाचारामुळे बांधकामे होत आहेत.बांधकामांवर सरसकट कारवाई करणार : लहानेयंदाच्या निवडणूक कामात महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी पूर्णपणे व्यस्त होते. पण या काळात शहरात जी बेकायदा बांधकामे झाली आहेत ती तोडली जातील. यात जर अधिकारी-कर्मचारायांनी कसूर केली असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. असे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी सांगितले.दरम्यान, मीरा-भार्इंदरमध्ये बेकायदा बांधकामांना महापालिका, महसूल विभागासह लोकप्रतिनिधींचे भ्रष्ट संगनमत कारणीभूत आहे. बेकायदा बांधकामांमधून कोट्यवधींचा मलिदा मिळत असल्याने शहराचे वाटोळे होत आहे. पालिका व महसुल विभागाच्या अधिकारायांसह त्या भागातल्या नगरसेवकावर देखील कारवाई करायला हवी, अशी मागणी सुनिल कदम या नागरिकांनी केली आहे.