सुरेश लोखंडेलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तीन लोकसभा मतदार संघामधील उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी तीन खर्च निरिक्षक जिल्ह्यात उपस्थित झाले आहेत. त्यांचे कार्यालयेही ठिकठिकाणी सुरू झाली आहेत. त्या ठिकाणी किंवा भ्रमणध्वनीवर नागरिकांना अनावश्यक खर्चाच्या तक्रारी करण्याची मुभा आहे. मात्र, पाच दिवसांच्या कालावधीत या तिन्ही निरिक्षकांकडे नागरिकांकडून एकही तक्रार आजपर्यंत आली नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.या निवडणुकीसाठी वेगवेगळ पथकांच्या निरीक्षकांची नियुक्ती जिल्ह्यात करण्यात आली आहे. यामध्ये सर्वसाधारण निरीक्षक, खर्च निरीक्षक, कायदा व सुव्यवस्था निरीक्षक नियुक्त केले आहेत. या प्रत्येकावर दोन मतदारसंघाची जबाबदारी दिले जाणार आहे. तसेच स्वीप निरीक्षक हे लोकसभा मतदारसंघनिहाय तैनात राहणार आहेत. याप्रमाणेच जिल्ह्यात सद्यस्थितीला तैनात असलेल्या पथकांकडून अवैध दारू, आचारसंहितेचा भंग करण्याऱ्या घटनांवर लक्ष केंद्रीत केले जात आहे. याशिवाय बँकेतून काढण्यात येणाऱ्या मोठ्या रकमांसह अन्यत्र नेण्यात येणाºया रकमांना खर्च निरिक्षकांच्या नजरा टिपत आहेत. यासाठी अद्याप नागरिकांकडून खास तक्रारी आलेल्या नाहीत. पण ठिकठिकाणी आलेल्या संशयावरून जिल्ह्यात या खर्च निरिक्षकांनी मोठ्या रकमेची रोखड जप्त केल्याचे दिसून आले.जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदार संघापैकी भिवंडीमधून पहिल्या दिवशी साडेचार लाख रूपये आणि दुसºया दिवशी म्हणजे शुक्रवारी दोन लाख १४ हजार आणि दहा लाखांची रक्कम वाहनातून पकडण्यात आली. या रोकड जप्तीच्या तीन घटना भिवंडीमध्ये घडल्या आहेत. तर ठाणे मतदार संघातील बेलापूर विधानसभा मतदार संघामधील उरणफाटा ब्रीज येथे वाहनातून घेऊन जात असलेली दहा लाखांची रक्कम पकडली आहे. खर्च निरिक्षकाच्या पथकांकडून या रकमा पकडल्या आहेत. अशाच काही तक्रारी नागरिकांकडून होणे अपेक्षित आहे. पण या स्वरूपाची तक्रांरी किंवा त्यासाठी एकही भ्रमणध्वनी नागरिकांकडून आला नसल्याचे वास्तव ठाणे मतदारसंघातील खर्च निरिक्षक श्रीवास्तव यांच्यासह कल्याणचे खर्च निरिक्षक विवेकानंद यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले............* मतदारसंघातील अवैध रकमेच्या पुरवठ्यास प्रतिबंद -या खर्च निरिक्षकांचे कार्यालयामध्ये देखील नागरिकांकडून काहीही तक्रारी आलेल्या नाहीत. पण येथील पथकांनीे सध्या रस्त्यांवरील अवैध घटनांवर लक्ष केंद्रीत केले आहे. निवडणूक उमेदवारी भरल्यानंतर आणि उमेदवारी माघार घेण्याच्या कालावधीत संबंधीत ठिकाणी खर्च निरिक्षक संबंधीत कार्यालयात थांबणार असल्याचे खर्च निरिक्षक विवेकानंद यांनी सांगितले. यामुळे तिन्हीही खर्च निरिक्षकांच्या कार्यालयांमधील दूरध्वनी सध्या उचलण्यात येत नसल्याचे सांगितले जात आहे. जिल्ह्यातील कोणत्या मतदार संघात अवैध रकमेचा पुरवठा कोठूनही होऊ नये, यासाठी खर्च निरिक्षकांच्या नजरा चौफेर लक्ष ठेवून आहेत. बँकांमधून होणाºया आर्थिक व्यवहारांवर देखील नजर ठेवून आहे. संशयास्पद व्यवहार आढळून आल्यास संबंधीत बँकांनी तात्काळ निवडणूक यंत्रणेस कळवण्याचे निर्देश ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक खर्च निरिक्षकांकडे नागरिकांकडून तक्रारींचा अभाव
By सुरेश लोखंडे | Published: April 07, 2019 5:27 PM
या निवडणुकीसाठी वेगवेगळ पथकांच्या निरीक्षकांची नियुक्ती जिल्ह्यात करण्यात आली आहे. यामध्ये सर्वसाधारण निरीक्षक, खर्च निरीक्षक, कायदा व सुव्यवस्था निरीक्षक नियुक्त केले आहेत. या प्रत्येकावर दोन मतदारसंघाची जबाबदारी दिले जाणार आहे. तसेच स्वीप निरीक्षक हे लोकसभा मतदारसंघनिहाय तैनात राहणार आहेत.
ठळक मुद्देया निवडणुकीसाठी वेगवेगळ पथकांच्या निरीक्षकांची नियुक्ती रोकड जप्तीच्या तीन घटना भिवंडीमध्ये बेलापूर विधानसभा मतदार संघामधील उरणफाटा ब्रीज येथे वाहनातून घेऊन जात असलेली दहा लाखांची रक्कम