नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी:भिवंडी शहरात ७३ वर्षे पूर्ण करणारी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागरीक बँकेच्या संचालक मंडळाच्या पंच वार्षिक निवडणूक नुकताच पार पडली.ज्या मध्ये सर्वपक्षीय जुना पॅनल असलेल्या नागरीक एकता पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे.त्यानंतर मंगळवारी सायंकाळी उशिरा अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली.या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी मकी सिद्दीकी पटेल व उपाध्यक्ष पदासाठी रोहन सोनवणे या दोन संचालकांचे अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली.
या निवडी नंतर नागरीक एकता पॅनलचे प्रमुख आमदार महेश चौघुले,शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष सुभाष माने यांसह संचालक अन्सारी मोह.फैसल जाहिद,बहाउद्दीन आदिब शरफुद्दीन,चौघुले परेश चंद्रकांत,फकिह असद गुलाम मुर्तुजा,करनाले कामील जहिरुद्दीन,मोहम्मद इलयास अब्दुल हफीज,राजू गाजंगी, संदीप पवार आदींनी नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्षांचे अभिनंदन केले.बँकेच्या आर्थिक व्यवसाय वाढीसह भिवंडीकर भागधारकांचा विश्वास सार्थ ठरविण्याचा प्रयत्न सर्व संचालक व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने करणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष मकी पटेल यांनी दिली आहे .
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"