मुरबाड : ग्रामपंचायत निवडणुकीत मुरबाड तालुक्यातील १३ पैकी केवळ ४ ठिकाणी भाजपाचे सरपंच निवडून आले. तर राष्ट्रवादी आणि शिवसेना युतीची सरशी होऊन सरपंचपदाच्या ९ जागा त्यांना मिळाल्या. या निवडणुकीत काही ठिकाणी जुनी भाजपा विरूध्द नवी भाजपा अशी लढत झाल्याचेही दिसून आले.तालुक्यातील १३ पैकी तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. ऊर्वरित १० ग्रा.पं.साठी सोमवारी मतदान झाले. मंगळवारी त्याची मतमोजणी तहसील कार्यालयात झाली. या वेळी कोणत्याही प्रकारचा अनुचीत प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवला होता.१३ ग्रामपंचायतींपैकी माळ, आसोळे, कान्होळ, खोपिवली, भादाणे, साकुर्ली, तोंडली, आंबेळे (बु.) आणि किशोर येथे राष्टÑवादी - सेना युतीचे सरपंच विजयी झाले. तर वैशाखरे, सासणे, डोंगरन्हावे, मोहघर या ग्रामपंचायतींचे सरपंचपद भाजपाकडे गेले आहे. या निवडणुकीत शिवसेना आणि राष्टÑवादीच्या युतीची सरशी झाल्याने लवकरच होऊ घातलेल्या जि.प. आणि पं.स. निवडणुकीतील विजयाची ही मुहूर्तमेढ असल्याची चर्चा आहे. विजयी सरपंच तसेच सदस्यांचे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुभाष पवार यांनी स्वागत केले. निवडून आलेल्या सदस्यांनी महिन्याभरात निवडणूक खर्च सादर करावा, अन्यथा त्यांचे पद धोक्यात येण्याची शक्यता असल्याचे तहसीलदार सचिन चौधर यांनी सांगितले.राष्टÑवादी - सेना आणि भाजपाचे नवे सरपंचसरपंचपदी निवडून आलेले (१) प्रवीण कोर (आसोळे), (२) गीता पवार (आंबेळे), (३) लक्ष्मीबाई शिद (माळ) (४) मनीषा देसले (कान्होळ), (५) जानु गायकर (किशोर), (६) दशरथ शेलवले (भादाणे), (७) सुषमा पडवळ, (तोंडली), (८) प्रतिभा रांजणे, साकुर्ली, (९) चांगुणा वाघ, (खोपिवली) हे युतीचे तर (१) बुधाजी पारधी (वेैशाखरे), (२) रुपाली शेळके (डोंगरन्हावे) (३) गणेश भोईर (सासणे) आणि मोहघर या ग्रामपंचायतींचे सरपंचपद भाजपाकडे गेले.
निवडणुकीत भाजपाची पीछेहाट, राष्ट्रवादी शिवसेनेची सरशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 5:58 AM