भिवंडी : एकात्मिक पाणीपुरवठा योजनेतंर्गत महापालिका क्षेत्रात बांधलेल्या १६ जलकुंभापैकी चार जलकुंभाचा लोकार्पण सोहळा मंगळवारी झाला. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या हलगर्जीपणामुळे ही योजना रखडली होती. मात्र ऐन निवडणुकीच्या काळात मतदारांना खूष करण्यासाठी हा पाणीपुरवठा प्रशासनाने सुरू केला असून त्यामुळे ठरविक प्रभागातील नगरसेवकांना त्याचा फायदा होणार असल्याचा आरोप केला जात आहे.जलशुद्धीकरण केंद्राचे भूमिपूजनही महापौरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी महापौरांसोबत स्थायी समिती सभापती इम्रान वली खान, काँग्रेस गटनेते जावेद दळवी, राष्ट्रवादी काँग्रेस गटनेते भगवान टावरे ,प्रभाग समिती क्र मांक ३ च्या सभापती पूनम पाटील उपस्थित होते. त्यानंतर झालेल्या छोटेखानी कार्यक्र मात महापौर तुषार चौधरी यांनी पाणीचोरी प्रकरणी प्रशासनाने कडक धोरण अवलंबून पाणीचोरी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी सूचना प्रशासनास केली. दळवी यांनी शहरातील शेवटच्या टोकापर्यंत सुरळीत पाणी पोहचेल तेव्हाच ही योजना सफल झाल्याचे म्हणता येईल,असे मत व्यक्त केले. या प्रसंगी आयुक्त योगेश म्हसे यांच्यासह अधिकारी व नगरसेवक उपस्थित होते. महापालिका स्थापन झाल्यानंतर शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार पाण्याची मागणी वाढली होती. त्यामुळे स्टेमकडून २५ एमएलडी पाणी मंजूर करून ते पाणी नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी एकात्मिक पाणीपुरवठा योजनेतंर्गत शहरात विविध ठिकाणी १६ जलकुंभाचे बांधकाम करण्यात आले. परंतु या जलकुंभात पाणी नेण्याची कोणतीही व्यवस्था केलेली नव्हती. त्यामुळे हे काम तब्बल आठ वर्षे रखडले होते. यासाठी नगरसेवकांनीही प्रयत्न केले नाही. (प्रतिनिधी)आयुक्तांमुळे प्रश्न धसासआयुक्त योगेश म्हसे यांनी पाणीपुरवठा विभागाच्या वारंवार आढावा बैठका घेऊन हा प्रश्न धसास लावला आणि युध्दपातळीवर १६ जलकुंभापैकी ५ जलकुंभात पाणी सोडण्याचे काम हाती घेऊन पूर्ण केले. त्यामुळे निवडणूकीपूर्वी शहरवासींना पाणी मिळाले आहे. पाणीचोरी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
निवडणुकांमुळे घरात येणार पाणी
By admin | Published: April 14, 2017 3:20 AM