सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका अग्निशमन विभागाने मध्यवर्ती रुग्णालयातील सुरक्षाविषयक उपाययोजना अपुऱ्या असल्याचा ठपका ठवून ऑडिट करण्याची नोटीस दिली. या प्रकाराने रुग्णालयाची फायर, तसेच इलेक्ट्रिक ऑडिट वादात सापडला आहे. मात्र, रुग्णालयाचे जिल्हा चिकित्सक डॉ.सुधाकर शिंदे यांनी फायर व इलेक्ट्रिक ऑडिट दरवर्षी झाल्याची माहिती दिली.
भंडारा येथील रुग्णालयात घडलेल्या अग्निकांडानंतर रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिटची चर्चा सुरू झाली. शहरात जिल्हास्तरीय मध्यवर्ती रुग्णालय असून, जिल्ह्यातील ग्रामीण परिसरासह कर्जत, कसारा, मुरबाड, शहापूर, अंबरनाथ, बदलापूर व वांगणी परिसरातून शेकडो रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात येतात. इलेक्ट्रिक वायरिंगबाबत पाहणी केली असता, इलेक्ट्रिक उपकरणे, वायरिंग जोडणी याबाबत तज्ज्ञांनी प्रश्नचिन्ह उभे केले. त्यामुळे या रुग्णालयाचे फायर ऑडिट हे केवळ नावापुरतेच झाले असल्याची जाेरदार चर्चा शहरामध्ये आधीपासूनच सुरू आहे.
पाहणीत काय आढळले ?मध्यवर्ती रुग्णालयाची पाहणी केली असता, भिंतीवर लोंबकळलेली जुनाट वायरिंग आढळून आली. इलेक्ट्रिक उपकरणे, इलेक्ट्रिक जोडणी, वायरिंग फिटिंग व्यवस्तीत नसल्याने शॉर्ट सर्किटचा धोका जाणवला. रुग्णालयाची जुनी इमारत असून, तितकीच जुनाट वायरिंगची फिटिंग दिसली. संपूर्ण रुग्णालयाचे नवीन इलेक्ट्रिक फिटिंग करणे गरजेचे आहे.
फायर सेफ्टीकडे दुर्लक्षकामगार रुग्णालय व शासकीय प्रसूतिगृह व मध्यवर्तीरुग्णालयांची फायर सेफ्टी अपुरी असल्याचा ठपका महापालिका अग्निशमन विभागाने ठेवून नोटिसा दिल्या आहेत. कामगार रुग्णालयाची फायर सेफ्टी कुचकामी असल्याची माहिती अग्निशमन विभागाचे प्रमुख बाळू नेटके यांनी दिली आहे.
रुग्णालय नेहमीच फायर सेफ्टीबाबत सतर्कमध्यवर्ती रुग्णालयाचे फायर ऑडिट व इलेक्ट्रिक ऑडिट दरवर्षी होते. याबाबतची माहिती वरिष्ठांना वेळोवेळी दिली जाते. अग्निशमन विभागाने जिल्हास्तरीय रुग्णालयातील फायर यंत्रणा अद्ययावत नसल्याची नोटीस दिली आहे. रुग्णालय फायर सेफ्टी ऑडिट व इलेक्ट्रिक ऑडिटबाबत सतर्क असते. - सुधाकर देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक
रुग्ण रुग्णालयात किती सुरक्षित आहेत?
मध्यवर्ती रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ८०० पेक्षा जास्त आहे. त्या खालोखाल शासकीय प्रसूतिगृह व कामगार रुग्णालयातील रुग्णांची संख्या आहे. रुग्णालय व रुग्णांच्या संख्येच्या प्रमाणात मध्यवर्ती रुग्णालयात सुखसुविधांचा अभाव असून, फायर व इलेक्ट्रिक सेफ्टी यंत्रणाचा अभाव नाही. - राजू तेलकर,सामाजिक कार्यकर्ता
मध्यवर्ती रुग्णालयाला जिल्हास्तरीय रुग्णालयाचा दर्जा मिळाला असून, जागतिक बँकेने अद्ययावत यंत्रसामग्री दिली आहे. मात्र, अपुरी कर्मचारी संख्या, डॉक्टर व तज्ज्ञांअभावी अनेक मशीन वापराविना धूळखात पडल्या आहेत. त्यामुळे रुग्णांना चांगली सेवा देण्यात माेठी अडचण येत आहे. ही बाब लक्षात घेउन ताबडताेब उपाययाेजना करणे - निशा भगतसामाजिक कार्यकर्ती