डोंबिवली : मीटररीडिंगसाठी नेमलेल्या खासगी कंत्राटदाराच्या चुकीमुळे महावितरणची भरमसाट वीजबिले ग्राहकांना पाठवल्याचा प्रकार एमआयडीसी, मिलापनगरमध्ये उघड झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी हा प्रकार महावितरण अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला.
नलावडे म्हणाले की, ग्राहकांना फेब्रुवारीची भरमसाट वीजबिले पाठवल्याने शुक्रवारी नागरिकांनी महावितरणच्या डोंबिवली एमआयडीसी कार्यालयावर गर्दी केली होती. कंत्राटदाराच्या चुकीमुळे हा प्रकार झाल्याचे स्पष्टीकरण देऊन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीजबिले कमी करून दिली.मिलापनगरमधील प्रभाकर जोशी (८०) यांना भरमसाट बिल आले होते. मात्र, त्यांना महावितरणच्या कार्यालयात खेटे घालणे शक्य नसल्यामुळे त्यांनी इतरांमार्फत मीटरचे फोटो काढून अधिकाºयांना दाखवले असता त्यांना बिल कमी करून देण्यात आले. नागरिकांनी अधिकाºयांशी संपर्क साधला असता त्यांनी नवीन ठेकेदार नेमला असून त्यांच्याकडून नोंदी घेताना त्रुटी राहिल्यामुळे ग्राहकांना वाढीव बिले पाठवण्यात आल्याचे कारण दिले. कंत्राटदाराच्या चुकीमुळे ग्राहकांचा वेळ, पैसा वाया जात आहे. महावितरणने दोषींवर कारवाई करण्याची मागणी नलावडे यांनी केली आहे.तांत्रिक अडचणीमुळे चूकमहावितरणच्या अधिकाºयांनी सांगितले की, मीटरतपासणीसाठी कंत्राटदाराचे कर्मचारी गेले असता त्यांना तांत्रिक अडचण आली. त्यामुळे काही ग्राहकांच्या बिलांमध्ये मोठी तफावत दिसत आहे. पण, आमच्या कर्मचाºयांनी ग्राहकांच्या मीटरचा फोटो व संगणकाचा आधार घेऊ न पडताळणी केली. त्यानंतर बिलांत आवश्यक ते बदल करून दिले.