मुंब्रा : ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्यामुळे मुंब्य्रातील संजयनगर भागातील वीजपुरवठा सलग ४२ तास खंडित होता. त्यामुळे मुंब्रावासीयांना दोन रात्री अंधारात काढाव्या लागल्या. येथील दोन ट्रान्सफॉर्मरपैकी एक २५ जून रोजी अमृतनगर येथे हलवण्यात आला होता. त्यामुळे एका ट्रान्सफॉर्मरवर विजेचा दाब वाढल्यामुळे तो सोमवारी रात्री नादुरुस्त झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. मंगळवारी मध्यरात्री लावण्यात आलेला नवीन ट्रान्सफॉर्मर बुधवारी दुपारी अडीच वाजता कार्यान्वित करण्यात आला. तोपर्यंत वीजपुरवठा खंडित होता. त्यामुळे स्थानिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागले. त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावरदेखील झाला.
मुंब्य्रात ४२ तास वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 2:59 AM