शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

मुंब्रा-शीळच्या ५७ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 3:32 AM

महावितरणच्या भांडुप नागरी परिमंडळांतर्गत येणाऱ्या ठाणे-३ या विभागातील मुंब्रा-शीळ या भागात महावितरणने धडक कारवाई करून मागील आठ महिन्यांत १३६४ वीजचोºया पकडून एक कोटी ९५ लाख रुपये वसूल केले आहेत.

ठाणे : महावितरणच्या भांडुप नागरी परिमंडळांतर्गत येणाऱ्या ठाणे-३ या विभागातील मुंब्रा-शीळ या भागात महावितरणने धडक कारवाई करून मागील आठ महिन्यांत १३६४ वीजचोºया पकडून एक कोटी ९५ लाख रुपये वसूल केले आहेत. विशेष म्हणजे महावितरणने मुंब्रा, शीळ भागात तब्बल ५७ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या ग्राहकांकडे मुद्दल आणि व्याजासह ३०० कोटींची थकबाकी असल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी शुक्रवारी दिली.महावितरणने आॅगस्ट २०१७ पासून पकडलेल्या १३६४ केसेसमध्ये एकूण १९ हजार ५११ इतक्या युनिटची वीज चोरी केल्याचे उघड झाले. त्याचे मूल्य सुमारे एक कोटी ९५ लाख इतके होते. यापैकी ६५० वीजचोरांनी सुमारे एक कोटी सात लाख रु पयांचा भरणा केला आहे. यामध्ये ६५० पैकी ४९० ग्राहकांनी नियमानुसार तडजोड करून सुमारे १८ लाखांची दंडाची रक्कम महावितरणकडे भरणा केली आहे. तर, उर्वरित ग्राहकांकडे महावितरणचे अधिकारी पाठपुरावा करत असून त्यांनी दंडासह रक्कम न भरल्यास त्यांच्यावर रीतसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात येणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.अभय योजनेस अत्यंत अल्प प्रतिसादमहावितरणने कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांसाठी वेळोवेळी अनेक योजना जाहीर केल्या आहेत.परंतु, मुंब्रा व शीळ या भागांतून अशा योजनांना नेहमीच अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला आहे. सध्या या भागात सुमारे ५७ हजार इतक्या ग्राहकांची वीज कायमस्वरूपी खंडित केली असून त्यांच्याकडे २५० कोटी मुद्दल व ५० कोटी व्याज अशी एकूण सुमारे ३०० कोटी इतकी थकबाकी आहे. असे असले तरी सध्या सुरू असलेल्या अभय योजनेंतर्गत ठाणे-३ विभागात नव्याने रु जू झालेल्या टीमने सुमारे दोन हजार ग्राहकांकडून सुमारे दोन कोटी वसूल केले आहेत.भूलथापांना बळी नपडता ग्राहकांना सहकार्याचे आवाहनमहावितरणने चालू व थकीत वीजबिल वसुलीकरिता तसेच नवीन जोडणी व अन्य सुविधांकरिता कोणत्याही एजंटची नेमणूक केली नाही. त्यामुळे ग्राहकांनी अशा एजंटच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये.कर्मचाºयांना मारहाणवीजबिलवसुली व इतर दैनंदिन कामे करताना महावितरणच्या अधिकारी व कर्मचाºयांना मारहाण होण्याच्या घटना मुंब्रा व शीळ या भागांत मोठ्या प्रमाणात होतात. मागील आठ महिन्यांत कर्मचाºयांना मारहाणीच्या एकूण सहा घटना घडल्या आहेत. यातील सर्व दोषी ग्राहकांवर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

टॅग्स :thaneठाणे