शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
4
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
5
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
6
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
8
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
9
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
10
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
11
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
12
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
13
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
14
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
15
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
16
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
17
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
19
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
20
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

डोंबिवलीत इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या गोदामात अग्नितांडव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2018 8:40 AM

सारस्वत कॉलनी पंचायत बावडीजवळील राणा टॉवर येथे जे.के. एन्टरप्रायझेसमधील इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या गोदामाला भीषण आग लागली आहे.

डोंबिवली -  सारस्वत कॉलनी पंचायत बावडीजवळील राणा टॉवर येथे जे.के. एन्टरप्रायझेसमधील इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. हे गोदाम 15 वर्षे जुने आहे. मंगळवारी (6 मार्च) सकाळी 6.30 वाजता आग लागल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली. यानंतर तातडीनं याबाबतची माहिती अग्निशमन दलाला कळवण्यात आली. गोदामातून प्रचंड धुराचे लोट येऊ लागल्यानं खबरदारी म्हणून नागरिकांनी आधी इमारत रिकामी करत परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यासाठी धावपळ केली.

मनसेचे माजी नगरसेवक हर्षद पाटील यांचे पक्षाचे कार्यालय त्याच इमारतीमध्ये असून त्यांनी ही माहिती दिली. सकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती हाताळली. बराच वेळ धूर येत असल्याने अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांनी आधी बाहेरील बाजूने जेथून धूर बाहेर येत होता तेथे पाणी मारले. पण तरीही आग आटोक्यात येत नव्हती. त्या गोडाऊनमध्ये फ्रिज, टीव्ही संच यासह अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा समावेश असल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे आग आटोक्यात आणताना अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांना कठीण गेले. गोडाऊनमध्ये सामान भरपूर प्रमाणात भरुन ठेवल्याने नेमकी कुठेपर्यंत आग पसरली आहे हे सांगणे कठीण असल्याचे सांगण्यात आले. पण धूर आणि आगीचे प्रमाण बघता नुकसान प्रचंड झाले असल्याची शक्यता वर्तवण्यात आली.

गोदामाचे मालक प्रकाश जैन यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार गोदामामध्ये सुमारे सव्वा कोटी रुपयांचा माल असून त्यात एसी, फ्रिज, टी.व्ही., एलईडी टीव्ही संच, वॉशिंग मशिन आदी महागड्या विद्युत उपकरणांचा समावेश होता. नेमकी आग कशामुळे लागली हे माहीत नसून नुकसान मात्र प्रचंड झाले असण्याची शक्यता असल्याचे जैन म्हणाले.  अग्निशमन दलाचे अधिकारी दिलीप गुंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग विझवण्यासाठी वेळ लागणार असून बेसमेंट असल्याने अनेक अडथळे येत आहेत. त्यातच चार चाकी गाड्यांचे पार्किंग झाले असल्याने अग्निशमन दलाला मदतकार्य करताना अडथळे येत आहेत. त्या गाड्या बाहेर काढण्याचे काम सुरू आहे, त्यानंतरच पुढील माहिती मिळू शकेल असेही ते म्हणाले.

टॅग्स :fireआगdombivaliडोंबिवली