- जान्हवी मोर्ये, ठाणेलाल-पिवळ््या रंगाचा मेळ घालत तेवणारी पणती ही दिवाळीचे मुख्य आकर्षण असते. सध्या बाजारात मातीच्या, मेटलच्या आणि डेकोरेटिव्ह अशा विविध प्रकारच्या पणत्या आहेत. पण मोराच्या पाच दिव्यांची, एलिफंट ज्योत, २१ दिव्यांची आणि डबल डेकर कासवांची पणती सगळ््यांचे लक्ष वेधून घेत आहे. आकर्षकतेसाठी प्रसिध्द असलेल्या चायना पणत्यापेक्षा स्वदेशी पणत्यांना ग्राहकांकडून अधिक पसंती दिली जात आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवलीच्या बाजारपेठेत विविध प्रकारच्या पणत्या आल्या आहेत. घरांच्या सेंटरला रांगोळी काढून त्यात मोठी पणती ठेवण्याचा एक नवा ट्रेण्ड आला आहे. त्यासाठी एलिफंट ज्योत. डबल डेकर कासव आणि मोराच्या पाच दिव्यांची अशा विविध पणत्या आहेत. एलिफंट ज्योत या पणतीत खाली हत्ती असून त्याला दात आणि सोंड आहे. तसेच त्यांच्यावर ज्योत आहे. याशिवाय मोरांच्या खालील बाजूला दिवे, आणि एकावर एक असे दोन कासव बाजारात पाहायला मिळत आहे. या पणत्यांना ग्राहकांकडून जास्त मागणी आहे. तसेच सिंगल पणती ४० रूपयांला ४ याप्रमाणे बाजारात उपलब्ध आहेत. त्या तुलनेत चायना पणत्या महाग असून त्या १०० रूपयाला ६ या दराने उपलब्ध आहेत.त्यामुळे ग्राहकांचा ओढा स्वदेशी पणत्या खरेदी करण्याकडे अधिक असल्याचे विके्रत्यांनी सांगितले. याशिवाय २१ दिवे असलेली गोल आकाराची मोठी पणती पाहायला मिळत आहे. तिच्या मध्यभागी असलेल्या जागेत फुलांची सजावट करता येऊ शकते. किंवा तेल व पाणी टाकून त्यावर तरंगणारी पणती तेवत ठेवता येऊ शकते. आणि साईडने दिवे लावून सारे वातावरण तेजोमय करता येऊ शकते. तसेच विविध प्रकाराच्या २१, ११ व ५ दिवे असलेल्या पणत्या बाजारात उपलब्ध आहेत. ज्यांना डझनवर पणत्या खरेदी करायच्या आहेत. ते साध्या मातीच्या पणत्यांना प्राधन्य देतात. यामध्ये झिरो साईज पणती ४० रूपये डझन तर मोठी पणती ६० रूपये डझन आहे. डेकोरेटिव्ह वर्क केलेल्या पणत्यामध्ये यंदा पंचमुखी हत्ती, त्यावर नारळ, शंखाच्या आकाराच्या, मंदिराच्या आकाराच्या, तुळशी वृंदावन,पानाच्या, फुलांच्या आकाराच्या पणत्या पाहायला मिळत आहे. याशिवाय काच,मोती कुंदन वापरून आकर्षक केलेल्या पणत्या ही आहे. या पणत्या ८० रूपयांना जोडी मिळत आहे. पणत्यांना पर्याय म्हणून काही जण काचेचा ग्लास ही खरेदी करतात. या ग्लासमध्ये पाणी भरून त्यात रंग टाकून रंगीत पाणी तयार केले जाते. त्यामध्ये एखादी फ्लोटिंग कॅडल ठेवून हा ग्लास रांगोळीच्या मध्यभागी ठेवता येतो. या ग्लासमुळे रांगोळी खराब होत नसल्याने अनेक जण या ग्लासाचा पर्याय निवडतात. हे ग्लास १५ रूपयांना बाजारात उपलब्ध आहेत. बाजारात मातीचे कासव पाहायला मिळत आहे. या कासवाला वरच्या बाजूने झाकण आहे. हे झाकण उघडून त्यात चॉक लेट्स ठेवून ते गिफ्ट देता येऊ शकतात. किंवा झाकण न लावता त्यात ज्योत लावून पणती म्हणून त्यांचा वापर करता येऊ शकतो. हे कासव १२५ रूपयांना बाजारात आहेत. मोराच्या पाच दिव्यांची पणती १०० रूपयांला तर ११ दिव्यांची पणती २५० रूपयाला आहे. कुयरी ९ दिव्यांची पणती २४० रूपयांला,डबल डेकर कासव १८० रूपयाला आहे. डबल डेकर कासवांची खरेदी खासकरून लक्ष्मीपूजनसाठी केली जाते. डेकोरेटिव्ह पणत्यांमध्ये मिक्स कलर्सचा वापर केलेल्या पणत्या या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या पणत्या पुुणे, धारावीतील कुंभारवाड्यातून तयार होऊन येतात. या पणत्यांची एका दिवसाला ९०० ते १ हजारांच्या घरात विक्री होते. डेकोरेटिव्ह पणत्या मलेशिया, हैद्राबाद, चेन्नई अशा ठिकाणी जातात.
एलिफंट ज्योत, डबल डेकर कासवांचे आकर्षण
By admin | Published: November 03, 2015 1:03 AM