रविंद्र साळवे , मोखाडाआत्मभाना शिवाय महिला सबलीकरण अशक्य असल्याचे मत आर.बी.एन.बी महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या प्राध्यापिका उज्वला जाधव यांनी व्यक्त केले त्या मोखाडा महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मानवी हक्क व महिला सबलीकरण कार्यशाळेत बोलत होत्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या १२ व्या योजनेतून रयत शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थीनीसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० ते सायंकाळपर्यत चाललेल्या या कार्यशाळेत चार सत्रामध्ये अनक्रमे आरोहण संस्थेच्या आरोग्य समन्वयक माधुरी मुकणे, प्रा.डॉ. प्रज्ञा कुलकर्णी (जव्हार महाविद्यालय), आर.बी.एन.बी.महाविद्यालय श्रीरामपूरच्या प्रा.डॉ. उज्वला जाधव व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथील इंग्रजी विभाग तील प्रा.डॉ. नागार्जुन वाडेकर यांनी विद्यार्थीनीना उद्बोधित केले. माधुरी मुकणे यांनी आपल्या मार्गदर्शनात आदिवासी भागातील तरु णीचे आरोग्य, अल्पवयीन विवाह यातुन कुपोषित अपत्याचा जन्म होणे असे चक्र सुरु आहे. ते थांबविण्यासाठी तरुणींनी बाल विवाहास नकार द्यावा, असे आवाहन केले तर प्रज्ञा कुलकर्णी यांनी १९८७ साला पासून जव्हार, मोखाडा आदिवासी भागात नोकरीच्या निमित्ताने काम करीत असतांना आलेले अनुभव कथन केले. व्यसनाधिनता, बहुप्रसवा यामुळे येथील स्त्रिया गुलामिगरीत अडकलेल्या आहेत त्यांना स्वत: ला आपण बंधनात आहोत हे कळत नाही तोवर त्यांच्यामध्ये जागृती होऊ शकत नाही असे सांगितले. तर तिसऱ्या सत्रामध्ये डॉ.उज्ज्वला जाधव यांनी मलाला युसूफजाई, दीपा मलिक व सिध्दम्मा यांच्या उदाहरणातून आत्मभान ते सबलीकरण ही स्त्री सबलीकरणाची साखळी मांडली. त्याचप्रमाणे अखेरच्या सत्राचे वक्ते प्रा. नागार्जुन वाडेकर यांनी मानवी हक्क आणि यंत्रणा यांचे परस्पर स्वरुप उलगडून दाखवले. त्यामुळे अगदी खेळीमेळीच्या वातावरणात यशस्वीपणे पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सी.डी.जैन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.डी.भोर, हे होते त्यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणा मध्ये विद्यार्थीनी नी वाचन करु न सजग व्हावे असे आवाहन केले तर या कार्यक्र माचे सफल नियोजन प्राचार्य डॉ.मढवी यांनी केले तसेच समन्वयक म्हणून प्रा. महाजन यांनी मोलाची जबाबदारी पार पाडली तर या कार्यक्र माचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.मगदुम यांनी पार पाडले.
आत्मभानातूनच होईल महिलांचे सबलीकरण!
By admin | Published: January 02, 2017 3:39 AM