लोकमत न्यूज नेटवर्कअंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिका हद्दीतील सरकारी जागेमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले जात आहे. याची कल्पना अधिकाऱ्यांना असतानाही त्यावर कारवाई केली जात नाही. सोबत वन विभागाच्या क्षेत्रातही अतिक्रमण वाढत असल्याचे समोर आले आहे. जावसई, फुलेनगर या भागात वन विभागाच्या जागेवर घरे बांधून ते विकण्याचे काम मोठ्या प्रमाणात केले जात आहे. जागा वन विभागाची असल्याचे कारण पुढे करून अंबरनाथ पालिकेचे अधिकारी त्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी चालढकल करत आहेत. तर दुसरीकडे याच वन विभागाच्या क्षेत्रात अतिक्रमणांना नागरी सुुविधा पुरवण्यात पालिका कमी पडत नाही. असाच प्रकार सरकारी जागेवरील अतिक्रमणांच्याबाबतीत घडत आहे. त्या ठिकाणीही अतिक्रमण वाढत आहेत. या सोबत केंद्र सरकारच्या आयुध निर्माण कारखान्याच्या मोकळ्या भूखंडावरही मोठ्या प्रमाणात झोपडपट्टीचे काम सुरू आहे. पालिका कार्यालयापासून २०० मीटरच्या अंतरावर हे अतिक्रमण होत असतानाही पालिकेचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.
सरकारी जागेवर अतिक्रमण वाढले
By admin | Published: July 17, 2017 1:07 AM