शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

मनपाच्या भूखंडावरच अतिक्रमण

By admin | Published: August 05, 2015 12:30 AM

कल्याण (पूर्व) ‘ड’ प्रभाग क्षेत्रअंतर्गत प्र.क्र.५०, शनिनगरमध्ये फेरिवाल्यांसाठी आरक्षण क्र. ४२२ सर्व्हे क्र. ५७ अ पैकी ३० गुंठे जमीन मोकळी असूनही मनपाने ताब्यात

दिवाकर गोळपकर , कोळसेवाडीकल्याण (पूर्व) ‘ड’ प्रभाग क्षेत्रअंतर्गत प्र.क्र.५०, शनिनगरमध्ये फेरिवाल्यांसाठी आरक्षण क्र. ४२२ सर्व्हे क्र. ५७ अ पैकी ३० गुंठे जमीन मोकळी असूनही मनपाने ताब्यात न घेतल्यामुळे वापर नाही. तसेच मनपा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे शाळेसाठी असलेली आरक्षण क्र. ४१७मध्ये सर्व्हे क्र. १२० पैकी २६ गुंठे असलेल्या जमिनीवर अतिक्रमण होते आहे. पांडुरंगनगर, जाईबाई मंदिर, हनुमाननगर ते पुनालिंक शेडपर्यंत मलवाहिन्या टाकल्या आहेत. परंतु पुढे चाळींकडे जाणारे रस्ते अरुंद असल्यामुळे मलवाहिन्या टाकण्यात आलेल्या नाहीत. ममता हॉस्पिटल रोड भागात मलवाहिन्या टाकण्यास खाजगी जागा मालकांनी विरोध केला आहे.प्रभागाची लोकसंख्या १३,५०० असून ५० टक्के चाळी व ५० टक्के इमारतींमध्ये मागासवर्गीय २० टक्के चाळी व ५० टक्के इमारतींमध्ये मागासवगी्रय २० टक्के, उत्तर भारतीय १५ टक्के, दक्षिण भारतीय १० टक्के, ख्रिश्चन ५ टक्के, महाराष्ट्रीय ५० टक्के अशी लोकवस्ती सामावली आहे. योगेश्वर टॉवर, खुशी हाईटस, कैराली पार्क, महासंतोशी कॉम्प्लेक्स, पांडुरंगनगर, हनुमाननगर, जुने पोस्ट आॅफिस व शनिमंदिर परिसर इ. भाग या प्रभागात मोडतो.या प्रभागात सुलभ शौचालय नाही, पण चाळीचाळींमध्ये सेफ्टी टँक आहेत, ज्यांची वेळोवेळी सफाई केली जाते. पांडुरंगनगर, मातृछाया सोसायटीमधील ८ चाळी, सहवास कॉलनी, पारिजात कॉलनी, जगन निवास, वस्त्या पाडा, भागात गटारे बांधली आहेत. हनुमाननगरची गटाबे बंदिस्त करून पदपथ बनवले आहेत. पुनम अपार्टमेंट ते भगवाननगर नाल्याचे काम व कमला पावशे चाळ, बाळाराम पावशे चाळ गटारांचे काम खाजगी जागा मालकांच्या विरोधामुळे होऊ शकले नाही. जलपरी अपार्टमेंट, लक्ष्मी पॅलेस ते रत्नप्रभा सोसायटी येथील पायवाटांची दुरावस्था आहे. जाईबाई रोडे ते शनिमंदिर रस्ता शनिभक्तांसाठी सिमेंटचा बांधण्यात आला. परंतु त्या रस्त्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पुणेलिंक रोड ते गावदेव रोड, काटे मानिवली सिमेंटच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. डांबरीकरण झालेल्या रस्त्यांवर खड्डे आहेत. यामुळे पाच वर्षात नगरसेवकांनी केले तरी काय? हा प्रश्न उपस्थित होतो.