शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
4
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
5
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
6
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
7
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
8
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
9
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
10
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
11
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
12
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
13
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
14
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
15
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
17
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
18
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
19
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
20
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका

साहित्य संमेलनचा हिशेब संपता संपेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 2:41 AM

शहरात पाच महिन्यांपूर्वी झालेल्या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने ५० लाखांचा निधी देण्याचे जाहीर केले होते.

- जान्हवी मोर्ये । लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : शहरात पाच महिन्यांपूर्वी झालेल्या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने ५० लाखांचा निधी देण्याचे जाहीर केले होते. संमेलनाचे आयोजक असलेल्या आगरी यूथ फोरमला २५ लाख रुपयांचा पहिला हप्ता देण्यात आला. मात्र, उर्वरित २५ लाख रुपये फोरमला अजूनही मिळालेले नाहीत. फोरमला महापालिका आर्थिक अडचणी असल्याचे कारण सांगत आहे. त्यामुळे संमेलनाची २५ लाखांची देणी चुकती करता येत नाहीत. परिणामी, या सर्वाचा फटका संमेलनाच्या हिशेब सादरीकरणास बसला आहे.डोंबिवलीत ९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान मोठ्या थाटामाटात झाले. या संमेलनाच्या आयोजनावर कोट्यावधी रुपयांचा खर्च झाला. संमेलनाच्या आयोजनासाठी महापालिकेने पालकत्व स्वीकारत ५० लाखांचा निधी देण्याची घोषणा केली. त्याप्रमाणे २५ लाखांचा निधी संमेलनाच्या आयोजनासाठी आधीच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला. उर्वरित निधी मिळणे अपेक्षित होते. मात्र संमेलनास पाच महिने झाली तरी २५ लाखांचा निधी अद्याप फोरमला मिळालेला नाही. या संदर्भात आयोजकांनी महापालिकेकडे पाठपुरावा केला आहे. आर्थिक स्थिती बिकट असल्याने महापालिकेकडून २५ लाखांचा निधी दिला जात नाही. मात्र, हा निधी दिला जाईल, असे आश्वासन वारंवार दिले जात आहे. या आश्वासनाची पूर्तता अद्याप केलेली नाही. आर्थिक स्थिती बिकट असतानाही महापालिकेतील कोट्यावधी रुपये खर्चाची विकासकामे मंजूर करण्यात येतात. त्याचे टेंडर काढले जाते. महापालिकेने संमेलनासाठी ५० लाखांची आर्थिक तरतूद केली होती. मात्र, ही रक्कम देण्यास महापालिका प्रशासनास काय अडचण आहे, असा सवाल साहित्यप्रेमींकडून केला जात आहे. महापालिकेने आर्थिक तरतुदीपेक्षा जास्त रक्कमेची विकासकामे घेतली आहेत. त्यामुळे महापालिकेने केलेली प्रत्यक्षातील तरतूद आणि घेतलेली विकासकामे यांचा ताळमेळ साधला जात नाही. या सगळ््याचा फटका संमेलन निधीस बसला आहे. महापालिकेकडून येणे वसूल झाले नसल्याने संमेलनाचा हिशेब पूर्णत्वास आलेला नाही. साहित्य संमेलनासाठी डोंबिवलीतील मानपाडा रस्त्यावर जगन्नाथ प्लाझा येथे फोरमला कार्यालय देण्यात आले होते. ती जागा वाचनालयासाठी आरक्षित असल्याने ती साहित्यिक उपक्रमासाठी दिली गेली होती. संमेलन झाल्यावर तीन महिन्यांनी ही जागा रिकामी करण्याची नोटीस महापालिकेच्या प्रभाग अधिकारी व मालमत्ता व्यवस्थापकांनी फोरमला पाठविली होती. मात्र देणीकरांची देणी अद्याप चुकती केलेली नाहीत. कार्यालय सोडले तर संमेलन आयोजकांनी पळ काढला, असा चुकीचा समज होईल. जोपर्यंत देणी चुकती होत नाही. तोपर्यंत कार्यालय त्याच ठिकाणी सुरू ठेवले जाईल. मुदत वाढवून मागण्याचे पत्र महापालिकेस दिले आहे. त्याचे भाडे भरण्याची तयारीही आयोजकांनी दर्शवली आहे. २४ लाखांची देणी थकलीआगरी यूथ फोरमचे प्रमुख गुलाब वझे यांनी सांगितले, की संमेलनासाठी झालेल्या एकूण खर्चापैकी २४ लाखांची देणी बाकी आहेत. महापालिकेकडून २५ लाख येणे बाकी आहे. याशिवाय महाराष्ट्र बँकेकडून जाहिरातीपोटी तीन लाख रुपये येणे बाकी आहे, असे एकूण २८ लाख रुपये थकले आहे. ही रक्कम वसूल होताच, २४ लाखांची थकीत देणी चुकती केली जातील. उर्वरित चार लाख रुपयांमधून वर्षभर साहित्यिक कार्यक्रम राबवले जाणार आहेत.