उल्हासनगर : शहर अभियंता महेश शितलानी यांना शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांनी दिल्याच्या निषेधार्थ पालिका कामगारांनी गुरूवारी कामबंद आंदोलन केले. कामगारांच्या आंदोलनाने महापालिकेचे कामकाज ठप्प झाले होते. दरम्यान, रामचंदांनी पितापुत्रांवर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
शितलानी बुधवारी दुपारी अभियंता जितू चोयतानी व कर्मचाऱ्यासोबत चर्चा करीत होते. त्यावेळी भाजपा नगरसेवक रामचंदानी यांनी कार्यालयात येवून माहिती अधिकारा अंतर्गत मागितलेली माहिती का दिली नाही? असा जाब विचारला. रामचंदानी यांचा मुलगा रोहित हाही उपस्थित होता. शितलानी व रामचंदानी यांच्यात वाद झाला. रामचंदानी पिता-पुत्रांनी शितलानी यांना शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. झालेला सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याची माहिती शितालानी यांनी दिली. बांधकाम विभागाच्या १४ कर्मचाºयांनी सहीचे निवेदन आयुक्त, महापौर, उपमहापौर, कामगार संघटनेचे नेते राधाकृष्ण साठे यांना देवून कारवाई करण्याची मागणी केली. पालिका आयुक्तांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी पत्र दिले, अशी माहिती शितलानी यांनी दिली. त्या पत्रानुसार शितलानी यांनी सहकाºयासोबत मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठून पोलिसांना घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती दिली. रामचंदानी यांच्यावर यापूर्वीही फाईल चोरीचा गुन्हा दाखल आहे.फसवण्याचा प्रयत्नविभागातील भ्रष्टाचाराला वाचा फोडत असल्याने शितलानी सहकाºयांना घेवून मला फसविण्याचा प्रयत्न करीत असल्याची प्रतिक्रीया रामचंदानी यांनी दिली. या घटनेमुळे पालिका अधिकारी, कर्मचाºयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशा परिस्थितीत काम कसे करायचे असा प्रश्न उपस्थित केला आहे.