बदलापूर : ज्या उल्हास नदीतून पाणी उचलण्यासाठी बंधारा उभारण्यात आला आहे, त्या बंधाऱ्यावरून वाहणाºया पाण्यात भिजण्याचा मनमुराद आनंद नागरिक घेत आहेत. धरणातून बाहेर पडणाºया पाण्यात भिजताना जीवितास धोका नसल्याने अनेक पर्यटक हे कुटुंबासह या ठिकाणी येतात. अत्यंत सुरक्षित हा बंधारा असल्याने आता उन्हाळी सुटीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी या ठिकाणी वाढत आहे.
बदलापूर शहरापासून काही अंतरावर उल्हास नदीच्या तीरावर हा बॅरेजचा बंधारा उभारण्यात आला आहे. २००५ च्या महापुरात ब्रिटिशकालीन बॅरेज धरण उद्ध्वस्त झाल्याने नदीपात्रातील पाणी उचलण्यासाठी लागलीच वर्षभराच्या आतच नव्या बंधाºयाचे काम पूर्ण करण्यात आले. २००७ मध्ये सरकारने उल्हास नदीवर हा बंधारा उभारला. उल्हास नदी ही बारमाही वाहणारी नदी असल्याने या ठिकाणी बंधाºयावरून पाणी वाहत असते. आंध्र धरणातील पाणी सोडल्यावर बॅरेज धरणावर सर्वात आधी पाणी अडवून त्यातून पाणी उचलण्यात येते. त्यानंतर, अतिरिक्त पाणी हे नैसर्गिक प्रवाहाच्या माध्यमातून बंधाºयावरून वाहत जाते. बंधाºयातून बाहेर पडणारा पाण्याचा प्रवाह हा धरणाच्या सौंदर्यात भर घालतो. त्यामुळे असंख्य पर्यटकही या निसर्गाच्या सान्निध्यात तयार झालेल्या नदी प्रवाहात भिजण्याचा मनमुराद आनंद घेतात. बंधाºयापासून २० ते २५ फूट अंतरापर्यंत काँक्रिटीकरण असल्याने या ठिकाणी पर्यटकांना नदीपात्रातील दगडगोटे पायाला लागण्याची भीती नाही.
नैसर्गिक तरणतलाव या ठिकाणी निर्माण झाला आहे. या पात्रात कमरेएवढे पाणी असल्याने ते पर्यटकांसाठी सुरक्षित मानले जाते. त्यामुळे या ठिकाणी कुटुंब आणि मित्रपरिवारासह येणाऱ्यांची संख्या ही सर्वाधिक आहे. शनिवारी आणि रविवारी याठिकाणी शेकडो पर्यटक येतात. सुरक्षित ठिकाणी पोहण्याचा आनंद घेणाºयांना कोणताच धोका नाही. मात्र, काही अतिउत्साही पर्यटक हे दारू पिऊन धरणाच्या पात्रात पोहण्याचा प्रयत्न करतात. या पर्यटकांमुळे काहींना जीवही गमवावा लागला आहे. धरणाच्या खोल पातळीत उड्या मारण्याचा प्रयत्न केला जात असल्याने अनेक जण त्या पात्रात बुडाले आहेत. त्यातच या ठिकाणी सुरक्षेचे कोणतेच उपाय नसल्याने अतिउत्साही पर्यटकांना रोखणे अवघड जाते. मात्र, जे धरणाच्या खालच्या पाण्याच्या प्रवाहात आनंद घेतात. त्यांना याठिकाणी कोणताच धोका नाही.